Join us  

तुळस वाढत नाही, कोमेजली? मातीत मिसळा ही खास पावडर, तुळस होईल डेरेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2023 4:59 PM

How to Grow Basil [Tulsi] At Home : सुकलेल्या तुळशीच्या मुळाशी टाका एका पानाची पावडर, हिवाळ्यातही तुळस हिरवीगार होऊन डोलू लागेल!..

भारतीय घरांमध्ये तुळशीचं रोपटं (Tulsi Plant) असतेच. या रोपट्याची विशेष काळजी घ्यावी लागत नाही, पण अजिबात दुर्लक्ष करूनही चालत नाही. तुळशीच्या रोपट्याला वेळेवर खत-पाणी नाही मिळाल्यावर ती सुकत जाते. शिवाय पानं पिवळी होऊन गळू लागतात. बऱ्याच जणांच्या घरात तुळशी अधिक दिवस टिकत नाही. योग्य काळजी नाही घेतल्यास ती सुकत नाही.

तुळशीची पानं आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. पण तुळशीची पानं सुकल्यानंतर त्याला पुन्हा नव्याने हिरवी पानं येतीलच असे नाही (Gardening). तुळशीचं झाड कोमेजल्यानंतर काय करावे? तुळशीचं झाड पुन्हा नव्याने हिरव्यागार पानांनी बहरेल का? तुळशीचं झाड कोमेजण्यामागे अनेक कारणे असू शकतात, पण हिवाळ्यात झाड लवकर का कोमेजते?(How to Grow Basil [Tulsi] At Home).

यासंदर्भात, हरजिंदगी या वेबसाईटला माहिती देताना कृषी विज्ञान केंद्रातील ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ आनंद सिंग सांगतात, 'बरेच जण हिवाळ्यात तुळशीचं झाड कोमेजत असल्याची तक्रार घेऊन येतात. खरंतर तुळशीच्या झाडाला जास्त पाण्याची आवशक्यता नसते. त्यामुळे या रोपट्याची जास्त काळजी घ्यावी लागत नाही. कारण हे झाड एक ट्रॉपिकल प्‍लांट आहे. त्यामुळे तुळशीचं झाड कमी पाणी, हवा आणि सूर्यप्रकाशात जगू शकते. पण वारंवार त्याची पानं गळत असतील किंवा कोमेजून जात असेल तर, त्यावर काही उपाय करता येऊ शकतात.'

हिवाळ्यात खायलाच हवा गुळाचा खडा, वजन कमी ते हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी होते मदत; सर्दी-खोकलाही राहतो दूर

कडूलिंबाची पानं

जर आपल्या घरातील तुळशीचं झाड पूर्णपणे सुकले असेल किंवा त्याची पानं सतत गळून पडत असतील तर, त्यावर उपाय म्हणून कडूलिंबाच्या पानांचा वापर करून पाहा. या उपायामुळे सुकलेलं तुळशीचं झाड पुन्हा नव्याने बहरेल. यासाठी दर महिन्याला २ चमचे कडुलिंबाच्या पानांची पावडर तुळशीच्या मातीमध्ये मिक्स करा. असे केल्याने तुळशीच्या रोपट्याला नवीन पानं येतील.

न वाफवता २० दिवस टिकणाऱ्या कोथिंबीर वडीची सोपी कृती पाहा, क्रिस्पी वडी-चवीला जबरदस्त

ऑक्सिजन गरजेचं

झाडांच्या मुळांना श्वास घेण्यासाठी पुरेशी जागा हवी असते. जेव्हा आपण कुंडीत पाणी ओततो, तेव्हा ते मुळापर्यंत जाते. बऱ्याचदा तो ओलावा दीर्घकाळ टिकतो. ज्यामुळे मुळांना श्वास घेण्यास अडचण निर्माण होते. अशावेळी आठवड्यातून एकदा माती खणून त्यात कोरडी माती आणि वाळू भरा. यामुळे झाडाची मुळे पुन्हा श्वास घेण्यास सुरुवात करतील.

टॅग्स :बागकाम टिप्ससोशल व्हायरल