सुपारीचे पान हे भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. जेवल्यानंतर अनेक जण सुपारीचे पान खातात (Betel Leaf). नागवेलीचे पान फक्त चाविलाच नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते (Gardening Tips). पानांमध्ये मधुमेह-विरोधी, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी, दाहक-विरोधी, व्रण-विरोधी आणि संसर्ग-विरोधी गुणधर्म असतात. शिवाय विड्याचे पान अँटिऑक्सिडंट्सचे पॉवरहाऊस म्हणून ओळखले जाते.
नागवेलीचे पान खाण्याची इच्छा झाल्यास आपण बाजारातून विकत आणतो. पण बाजारातून विकत आणलेले विड्याचे पान लवकर कोमेजतं. जर आपल्याला बाजारातून विड्याचे पान विकत आणायचं नसेल तर, घरातच नागवेली पानाची वेल लावा. पण या वेलाची नेमकी लागवड कशी करावी? पाहा(How To Grow Betel leaf Plant From Leaf).
बैठ्या कामामुळे पोट नुसतं सुटलंय? जेवल्यानंतर १० मिनिटे 'ही' गोष्ट करा; लवकरच पोट सपाट
नागवेलीची वेल कशी लावावी?
- नागवेलीची वेल लावण्यासाठी एक विड्याचे पान पुरेसं आहे. यासाठी एका बॉटलमध्ये पाणी भरा. त्या पाण्यात एक चमचा हळद घालून मिक्स करा. नंतर त्या पाण्यात विड्याचे पान ठेवा. ५ ते ६ दिवसांसाठी त्या पाण्यात विड्याचे पान ठेवा. नंतर पानांच्या देठातून मुळे येतील.
- एका कुंडीत मातीत भरा. त्यात पानांच्या देठातून मुळे आलेली बाजू मातीत रोवा. काही महिन्यात नागवेलीच्या वेलाला सुंदर हिरवेगार पानं येतील.
- नागवेलची वेल लावताना सावलीच्या ठिकाणी लावा. सावलीच्या ठिकाणी तापमान थंड राहते. ज्यामुळे सुपारीची पानं लवकर कोमेजत नाहीत. शिवाय कीटक आणि रोगांचा प्रादुर्भाव टळतो.
भरपूर चालूनही वजन घटेना? 'या' पद्धतीने - 'या' वेळी चाला, वेट लॉस होणारच; फक्त चालताना..
- नागवेलीला जास्त पाण्याची गरज लागत नाही. जास्त पाणी घातल्यास मुळांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. ज्यामुळे मुळे मातीत कुजू शकतात. त्यामुळे मातीत जास्त पाणी घालू नका.
- पावसाळा हा ऋतू नागवेलीच्या लागवडीसाठी अतिशय उत्तम असा ऋतू आहे. इतर कोणत्याही ऋतूंपेक्षा पावसाळ्यात नागवेलीची लागवड चांगल्या प्रकारे होते.