Join us  

विड्याच्या पानांचा वेल होईल हिरवागार-वाढेल भरभर, करा फक्त ५ गोष्टी-तब्येतीत खा विडा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2024 6:09 PM

How To Grow Paan Plant at Home : नागवेलीचा वेल असतो नाजूक, त्याची ‘अशी’ घ्या काळजी

शक्यतो बहुतेकजणांच्या बाल्कनीत किंवा गार्डनमध्ये नागवेलीचा वेल असतेच. हिरवीगार, लांबलचक नागवेलीच्या पानांची वेल बाल्कनीची शोभा वाढवण्याबरोबरच अनेक कामांसाठी फायदेशीर ठरते. नागवेलीच्या पानांचा वेल फक्त सजावटीसाठीच नाही, तर ती आपल्या पर्यावरणासाठीही फायदेशीर आहे. नागवेलीची पाने हवा शुद्ध करतात आणि ऑक्सिजन देतात, असे एक ना अनेक फायदे असलेला नागवेलीच्या पानांचा वेल लावणे सोपे असते परंतु त्याची निगा राखणे फार कठीण असते. या नाजूक पानांच्या वेलीची तितकीच नाजूक पद्धतीने काळजी घ्यावी लागते(How To Grow Betel leaf Plant From Leaf).

नागवेलीच्या पानांचा वेल चुकीच्या पद्धतीने लावल्यास किंवा त्याची योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यास तो लगेच सुकून जातो. नागवेलीच्या पानांची वेल जर आपल्याला लांबलचक, हिरवीगार हवी असेल तर तिची काळजी घेण्याची योग्य पद्धत समजून घेतली पाहिजे. आपण पाहिले असेल की, बाल्कनीत किंवा फ्लॉवर बेडमध्ये लावलेली नागवेलीची वेल काही काळानंतर सुकून जाते. असे होऊ नये म्हणून आपण काही महत्वाच्या टिप्स समजून घेऊयात. या टिप्सचा वापर करुन आपल्या बाल्कनीत नागवेलीचा वेल अगदी हिरवागार करु शकता, तसेच नागवेलीची पानेही अगदी लांबलचक होण्यास मदत मिळते ( How To Grow Paan Plant at Home).

नागवेल लावताना नेमकी कोणती काळजी घ्यावी ?

१. वालुकामय माती :- नागवेलीचा वेल हा चिकट मातीपेक्षा हलक्या आणि पाण्याचा योग्य निचरा करणाऱ्या वालुकामय मातीत चांगला वाढतो. वालुकामय मातीमुळे नागवेलीच्या  मुळांना हवा आणि पाणी सहज उपलब्ध होते, ज्यामुळे वेल अधिक चांगली आणि जलद वाढते. जर तुमच्याकडे वाळू असेल तर ती वाळू थोड्याशा मातीत  मिसळून त्यात नागवेलीचा वेल लावावा. यामुळे नागवेलीचा वेल चांगला वाढेल आणि त्याची पाने आकाराने मोठी होतील. या वेलीची लागवड योग्य पद्धतीने  करण्यासाठी २ भाग माती आणि १ भाग वाळूचे मिश्रण घेऊन त्यात हा वेल लावावा. 

२. नागवेल सावलीच्या ठिकाणी लावा :- सावलीच्या ठिकाणी पाणी कमी प्रमाणात वाष्प होते. त्यामुळे माती ओली राहते आणि सुपारीच्या मुळांना पुरेसे पाणी मिळते. सावलीच्या ठिकाणी तापमान थंड राहते. उन्हाळ्यात थेट सूर्यप्रकाश लागल्याने सुपारीची पाने सुकण्याचा धोका असतो. सावलीच्या ठिकाणी सुपारीची वेल अधिक चांगली वाढते आणि मोठी पाने येतात. सावलीच्या ठिकाणी कीटक आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. सावलीच्या ठिकाणी कीटक आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.सुपारीची लागवड करताना सावलीचे महत्त्व लक्षात घेणे आवश्यक आहे. योग्य प्रकारे सावलीची व्यवस्था केल्याने सुपारीचे उत्पादन वाढते आणि त्याची गुणवत्ता सुधारते. सावलीच्या ठिकाणी लागवड केल्याने सुपारीचे झाड दीर्घायुष्य असते. 

३. जास्त पाणी घालू नका :-  नागवेलीला जास्त पाण्याची गरज लागत नाही. जर तुम्ही जास्त पाणी दिलं तर मुळांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे मूळ कुजू शकतात, यामुळे वेल खराब होऊ शकतो. याउलट, जर तुम्ही कमी पाणी दिलं तर वेल सुकूही शकतो. माती नेहमी थोडी ओलसर असावी, पण संपूर्ण भिजलेली नसावी. नागवेलीला उन्हाळ्यात थोडे जास्त आणि हिवाळ्यात थोडे कमी पाणी द्यावे. 

४. मनी प्लांटप्रमाणेच करा लागवड :- मनी प्लांटप्रमाणेच आपण नागवेलीचीही लागवड माती आणि पाण्यात करु शकता. कोणत्याही काचेच्या भांड्यात किंवा वाडग्यात नागवेलीची लागवड करता येते. भांड्यात थोडेसे पाणी घाला. नागवेलीचा वेल पाण्यात ठेवा. भांड्याला अशा ठिकाणी ठेवा जिथे पुरेसा प्रकाश मिळेल. दर दोन-तीन दिवसांनी पाणी बदलत राहा. आपण पाण्यात थोडेसे खतही मिसळू शकता.

५. लागवडी साठी बेस्ट सीजन :- पावसाळा हा ऋतू नागवेलीच्या लागवडीसाठी अतिशय उत्तम असा ऋतू आहे. इतर कोणत्याही ऋतूंपेक्षा पावसाळ्यात नागवेलीची लागवड चांगल्या प्रकारे होते. पावसाळ्यात हा वेल अगदी लवकर बहरुन येतो.

टॅग्स :बागकाम टिप्स