Lokmat Sakhi >Gardening > दुधी भोपळ्याचा वेल छोट्या कुंडीत रुजतो का? 3 स्टेप- मिळेल कोवळी ताजी भाजी

दुधी भोपळ्याचा वेल छोट्या कुंडीत रुजतो का? 3 स्टेप- मिळेल कोवळी ताजी भाजी

How To Grow Bottle Gourd : चांगल्या प्रतीचे बियाणे बियाणे स्टोअरमध्ये सहज आणि स्वस्तात उपलब्ध होईल. तुम्ही दुधीच्या बियांपासून एक वनस्पती देखील वाढवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 05:27 PM2022-06-26T17:27:41+5:302022-06-26T18:10:07+5:30

How To Grow Bottle Gourd : चांगल्या प्रतीचे बियाणे बियाणे स्टोअरमध्ये सहज आणि स्वस्तात उपलब्ध होईल. तुम्ही दुधीच्या बियांपासून एक वनस्पती देखील वाढवू शकता.

How To Grow Bottle Gourd : How to grow bottle gourd from seed at home | दुधी भोपळ्याचा वेल छोट्या कुंडीत रुजतो का? 3 स्टेप- मिळेल कोवळी ताजी भाजी

दुधी भोपळ्याचा वेल छोट्या कुंडीत रुजतो का? 3 स्टेप- मिळेल कोवळी ताजी भाजी

दुधीची भाजी अनेकांना आवडत नसली तर दुधी हलवा सगळे आवडीनं खातात. दुधीचे पराठे,  चण्याची डाळ घालून केलेली दुधीची भाजी अनेकांची फेवरीट आहे. दुधी खरेदीसाठी जवळपास सर्वच जण बाजाराकडे वळतात. परंतु अनेक वेळा केमिकलयुक्त दुधीचे सेवन केल्याने माणसं आजारी पडतात. (How To Grow Bottle Gourd) काहीजण तर दुधी केमिकलयुक्त असल्याचं समजून  खाणं टाळतात. या लेखात तुम्हाला घरच्याघरी दुधी लावण्याच्या काही टिप्स सांगणार आहोत. जेणेकरून तुम्हाला कमी खर्चात ताज्या भाज्या खाता येतील. (How to grow bottle gourd from seed at home)

छोट्या कुंडीत वेल लागतो का?

बीयाणे, खत, माती, पाणी, भांडी

कोणतेही फळ आणि भाजीपाला लागवड करण्यासाठी चांगले बियाणे निवडणे खूप महत्वाचे आहे. यासाठी कोणत्याही ठिकाणाहून बियाणे खरेदी करू नये. जर तुम्हाला दुधीचे योग्य आणि अधिक चांगले  बियाणे खरेदी करायचे असेल तर तुम्ही कोणत्याही बियाण्याच्या दुकानात जाऊ शकता. चांगल्या प्रतीचे बियाणे बियाणे स्टोअरमध्ये सहज आणि स्वस्तात उपलब्ध होईल. तुम्ही दुधीच्या बियांपासून एक वनस्पती देखील वाढवू शकता.

मातीत बियाणे लावण्याआधी हे काम करा

बियाणे पेरण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. जर बिया बियाणे स्वरूपात असतील तर ते एक दिवस आधी पाण्यात भिजवून ठेवावे. ज्या मातीत बी पेरायचे आहे ती माती फोडून उन्हात ठेवावी. काही वेळ उन्हात ठेवल्यानंतर त्यात एक मग कंपोस्ट खत टाकून चांगले मिसळा. आता ही माती भांड्यात टाका. यानंतर दुसऱ्या दिवशी पाण्यातून बिया बाहेर काढून जमिनीच्या आत १-२ इंच दाबून वरून माती व पाणी ओतावे.

पावसाळ्यात लाकडाचा दरवाजा ना फुगणार ना जाम होणार; ३ टिप्स, लाकडाच्या वस्तू राहतील चांगल्या 

बियाणे अंकुरित होईपर्यंत आपल्याला काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. बिया उगवण्याआधी रोपाला कडक सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. बिया पेरल्यानंतर भांड्याच्या वर थोडे गवत देखील ठेवता येते. बियाणे अंकुरित होईपर्यंत नियमितपणे पाणी आणि खत देण्याची खात्री करा. जेव्हा बियाणे उगवतात तेव्हा गवत काढले जाऊ शकते.

पावसाळ्यात घरात माश्या येतात? ६ उपाय, किचनपासून बाथरूमपर्यंत कुठेच दिसणार नाहीत माश्या

वेलीला कीटकांपासून दूर ठेवण्यासाठी, कीटकनाशक फवारणी नियमितपणे करत राहणे फार महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही लिंबू, बेकिंग सोडा इत्यादींचा स्प्रे बनवू शकता. जेव्हा रोप 3-4 फूट मोठे होते तेव्हा त्याच्या भोवती लाकूड ठेवा आणि त्याला दोरीने बांधा जेणेकरून रोप वाढेल तेव्हा त्याला व्यवस्थित वाढता येईल. त्यामुळे  फळे जास्त लागतात. साधारण सात ते आठ महिन्यात दुधी रोपातून बाहेर पडू लागते.
 

Web Title: How To Grow Bottle Gourd : How to grow bottle gourd from seed at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.