Join us

कापूर म्हणजे नवसंजीवनी! ४ खतं घाला- अंगणात दरवळेल कापूराचा सुगंध, पाहा काय करायचे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2025 10:54 IST

How to grow camphor plant at home: Camphor plant care tips: Kapurche zhad kase laval: Growing camphor plant in balcony: Camphor tree growing guide: कापूरचे झाड लावायचे असेल आणि ते अधिक काळ टिकवायचे असेल तर काय करायला हवे पाहूया.

पूजेच्या वेळी किंवा आरती करताना कापूरचा वापर हमखास केला जातो. जितका तो धार्मिक कार्यात महत्त्वाचा आहे तितकाच आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.(How to grow camphor plant at home) कापूर त्याच्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे ओळखला जातो.(Camphor plant sunlight and water needs) यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा येते. त्यांच्या औषधी गुणधर्मांमुळे आणि सुगंधामुळे डासांना दूर ठेवण्यास उपयुक्त असते. (Best soil for camphor plant in pots)कधी घरी कापूर लावण्याचा विचार केला आहे का? आपण घराच्या अंगणात अनेक झाडे लावतो परंतु, कापूरचे झाड क्वचितच पाहिले असेल. (How to grow kapurche zhad in balcony step-by-step)ही वनस्पती सदाहरित वनस्पती आहे. पर्यावरणासाठी चांगली मानली जाते. यामुळे हवा शुद्ध करण्याचे काम होते. कापूरचे झाड लावायचे असेल आणि ते अधिक काळ टिकवायचे असेल तर काय करायला हवे पाहूया. (Tips to grow camphor plant indoors)

तुळस सारखी सुकते? मातीत घाला 'हे' घरगुती खत, उन्हाळ्यातही तुळस सुकणार नाही

कापूरचे झाड कधी लावावे?

कापूरच्या बियाणा उबदार जमिन लागते. या रोपाची लागवड करण्यासाठी सर्वात चांगला ऋतू हा वसंत म्हणजे उन्हाळा आहे. फेब्रुवारी ते मे महिन्याच्या दरम्यान आपण कापूरचे झाड लावू शकतो. 

रोपासाठी माती आणि कुंडी 

आपल्या घरात मोठी बाग असेल तर कापूरचे रोप आपण जमिनीत लावू शकतो. मोठ्या आकाराच्या भांड्यात, ग्रो बॅगचा वापरही करता येईल. कापूरचे रोप लावण्यासाठी ओलसर किंवा वाळूची माती चांगली असते. ज्यासाठी आपण कोकोपीट, शेणखत, गांडूळखत, परलाइट मिसळून माती तयार करा किंवा याची कुंडी तयार करुन माती वापरु शकता. 

कापूरचे रोप लावण्यासाठी बियांच्या मदतीने ते अंकुरित करा. यासाठी ट्रे किंवा ग्रो बॅगमध्ये माती भरा. जमिनीत १ सेमी खोलीवर कापूरच्या बिया लावा. वॉटरिंग कॅनचा वापर करुन पाणी द्या. बियांना अंकुरित होण्यासाठी ओलावा गरजेचा असतो. हे रोप अशा जागी ठेवा जिथून सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात मिळेल. 

कापूरच्या झाडाला वाढवण्यासाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. कमी सूर्यप्रकाशातही ते जगू शकते. या वनस्पतीला ओलसर मातीची आवश्यकता असते म्हणून नियमितपणे पाणी द्या. दर २-४ आठवड्यांनी खतांचा वापर करा. 

टॅग्स :बागकाम टिप्स