Join us  

घरातल्या लहानशा कुंडीत लावा वेलचीचे रोप, सुगंधी वेलची मिळेल घरबसल्या-पाहा रोप लावायचं कसं..

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 1:58 PM

How To Grow Cardamom Plant At Home : अनेकदा बाजारातून आणलेली वेलची सुकलेली असते.  अशावेळी वेलचीची योग्य चव कळून येत नाही.

किचनमध्ये वापरले जाणारे बरेच मसाले तुम्ही घरच्याघरी उगवू शकता. खासकरून आलं, वेलची, लवंग, कढीपत्ता, मिरच्या हे असे पदार्थ आहेत जे तुम्ही घरच्याघरी  छोट्याश्या कुंडीत लावू शकता. (How To Grow Cardamom Plant At Home) वेलचीच्या सुगंधानं संपूर्ण घरात वास दरवळतो, चहामध्ये किंवा गोड पदार्थांमध्ये आवर्जून वेलची घातली जाते. अनेकदा बाजारातून आणलेली वेलची सुकलेली असते.  अशावेळी वेलचीची योग्य चव कळून येत नाही. वेलची घरच्याघरी रोपात कशी लावायची ते समजून घेऊया. (How To Grow Cardomom At Home)

बेटर होम्स अॅण्ड गार्डनच्या रिपोर्टनुसार वेलचीचे रोप अर्धवट सावली असलेल्या ठिकाणी किंवा खिडकीजवळ पूरक विद्यूत दिव्यांचा प्रकाश येत असेल अशा ठिकाणी ठेवा.  थेट सुर्यप्रकाश असेल अशा ठिकाणी ठेवणं टाळायला हवं.  वेलचीचे झाड तुम्ही दमट वातावरणात कंटेनरमध्ये लावू शकता.   3 ते 4 वर्षांनी पूर्ण उत्पादनापर्यंत पोहोचते आणि 10 ते 15 वर्ष उत्पादन सुरू ठेवते.

केस गळणं वाढलंय? रामदेव बाबा सांगतात केस वाढवण्याचा खास उपाय, केस होतील दाट

 

त्यानंतर कुंडीत हे रोप लावा. कुडींतून पाणी बाहेर पडायला खाली जागा असावी याची काळजी घ्या. याशिवाय रेतीचा वापर करू शकता. माती, रेती किंवा वर्मी कंमोस्ट कुंडीत भरून व्यवस्थित एकजीव करून घ्या. नंतर त्यात वेलचीचे कलम किंवा बिया लावा. वेलची उगवण्यासाठी मातीचा पीएच स्तर ६.० ते ६.०५ च्या मध्ये असायला हवा. 

हाडं कमजोर, पोकळ झालीत? फक्त १० रूपांत पौष्टीक चण्याचे लाडू खा, हाडांसकट-मासंही बळकट राहील

कुडींत लावलेल्या रोपात मॉईश्चर टिकून राहील याची काळजी घ्या. पण माती जास्त ओली असू नये. कारण वेलचीची पानं थंड जलवायू सहन कूर शकत नाहीत.

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स