'हाय-हाय मिरची' म्हणत कितीही तिखट लागलं तरी आपण मिरची खातोच. मिरचीशिवाय अनेक पदार्थ अपूर्ण आहे. पदार्थात मिरची घालताच, जेवणाची रंगत वाढते. भारतीयांच्या प्रत्येक घरात हिरवी किंवा लाल रंगाची मिरची सापडेलच. रोजच्या स्वयंपाकामध्ये मिरचीचा सर्रास वापर होतो. बऱ्याचदा बाजारातून आणलेल्या मिरच्या संपतात, आणि ऐनवेळी मिरची आणण्यासाठी पुन्हा बाजारात जावे लागते (Red & Green Chilli).
अशावेळी घरातच मिरचीचे रोप असेल तर खूप उपयोगी ठरते. पण घरात मिरचीचे रोपटे लावल्यास त्याला मिरच्या येत नाही, किंवा रोपटे फक्त हिरव्यागार पानांनी बहरते (Gardening Tips). अशावेळी मिरचीच्या रोपट्याची काळजी कशी घ्यावी? त्यावर मिरच्या येण्यासाठी काय करावे?(How to Grow CHILLIES at Home!).
पानं कमी पण मिरच्यांनी बहरेल रोपटे
- मिरचीच्या रोपट्याला नेहमी सूर्यप्रकाशात ठेवावे. यामुळे रोपट्याची योग्य वाढ होते. यासह आठवडाभर किंवा १५ दिवसानंतर रोपट्याची पिवळी पानं छाटून काढा. यामुळे रोपट्याला हिरव्यागार मिरच्या येतील.
झाड खूप मोठे पण लिंबू लागत नाहीत? पाण्यात मिसळा एक पिवळा पदार्थ, येतील भरपूर लिंबू
- मिरचीच्या रोपट्याला नियमित पाणी घाला. पाण्याशिवाय रोपटे लवकर सुकते. शिवाय त्याची पानं पिवळी पडतात.
- जर रोपट्याला कीड लागत असेल, शिवाय योग्य वाढ होत नसेल तर, रोपट्याला पाणी घालण्यापूर्वी त्यात एक गोष्ट मिक्स करा.
तुळस सुकेल-पानं गळतील, तुळशीच्या बाजूला लावू नयेत ३ रोपं, कारण..
- एका वाटीत ५०० मिली ताक, ३० ग्रॅम मोहरीची पेंड आणि २ ग्रॅम पाणी घालून मिश्रण तयार करा. तयार मिश्रण ३ दिवसांसाठी तसेच ठेवा, ३ दिवसानंतर मातीत मिक्स करा. आपण याचा वापर आठवड्यातून एक वेळा करू शकता. मातीत हे मिश्रण मिक्स केल्याने पानं कमी पण मिरच्यांनी रोपटे बहरेल.