Join us  

छोट्याशा कुंडीतही येतील भरपूर लवंगा, बघा कमीतकमी जागेत कसं वाढवायचं लवंगाचं रोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2024 1:55 PM

Gardening Tips For Clove Plant: एका मध्यम आकाराच्या कुंडीमध्ये तुम्ही भरपूर लवंगा लावू शकता, बघा घरच्याघरी छोट्याशा कुंडीमध्ये लवंगाचं रोप लावण्याची ट्रिक...(how to grow clove spices at home?)

ठळक मुद्देलवंगाचा कलम लावण्यासाठी साधारण १२ ते १३ इंच व्यास असणारी कुंडी पुरेशी ठरेल. लवंगेसाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी माती लागते. त्यामुळे माती चिकट नको. थोडी भुसभुशीत प्रकारातली हवी

हल्ली घरासमोर मोकळं अंगण असणाऱ्या घरांची संख्या कमीच होत चालली आहे. त्यामुळे मग टेरेसमध्ये, बाल्कनीत, गच्चीवर आपण हौशीने बाग फुलवतो. आपल्या आवडीची वेगवेगळी रोपं तर आपण त्यात लावतोच. पण कधी कधी रोजच्या उपयोगाला येतील अशी कडिपत्ता, गवती चहा, कोथिंबीर, पुदिना, मिरच्या अशी रोपंही लावतो (how to grow clove spices at home?). आता तुमच्या बागेत लवंगाचं रोप लावून पाहा (best trick to plant clove in your terrace garden). मसाल्याच्या पदार्थांपैकी लवंग, वेलची, तेजपान हे पदार्थ कुंडीमध्ये लावायला सोपे आहेत. (Gardening Tips For Clove Plant)

 

कुंडीमध्ये कसं लावायचं लवंगाचं रोप?

कुंडीमध्ये लवंगाचं रोप कसं लावायचं याविषयी कृषीतज्ज्ञ रविकांत पांडे यांनी दिलेली माहिती न्यूज१८ ने प्रकाशित केली आहे. त्यामध्ये पांडे असं सांगतात की तुमच्या घरातल्या ४ ते ५ लवंगा २४ तासांसाठी पाण्यात भिजत घाला.

रोज टाच दुखते- पायावरही सूज? तुमचं लिव्हर आजारी असण्याची शक्यता, पाहा फॅटी लिव्हरची लक्षणं 

त्यानंतर छोट्या कुंडीमधल्या मातीत १ इंच खोल खड्डा करून त्यात त्या टाका. ही कुंडी उन्हामध्ये ठेवा आणि माती सुकत आली की पाणी घाला. काही आठवड्यात लवंगाचं रोप उगवेल. पण या पद्धतीने लवंग लावणं थोडं अवघड आणि खूप वाट पाहायला लावणारं आहे. त्यामुळे तुमच्या शहरातल्या नर्सरीतून तुम्ही लवंगाचे कलम आणून ते लावा. ही पद्धत अधिक सोपी आहे.

 

लवंगाच्या रोपाची कशी काळजी घ्यावी?

लवंगाचा कलम लावण्यासाठी साधारण १२ ते १३ इंच व्यास असणारी कुंडी पुरेशी ठरेल. लवंगेसाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी माती लागते. त्यामुळे माती चिकट नको. थोडी भुसभुशीत प्रकारातली हवी.

जेवल्यानंतर चालावं की रिकाम्यापोटी चालावं? वजन कमी करण्यासाठी बघा काय जास्त चांगलं... 

यासाठी तुम्ही मातीमध्ये थोडी रेती मिसळू शकता. माती, रेती आणि गांडुळखत सम प्रमाणात घेऊन कुंडीमध्ये भरा आणि त्यात लवंगाचे रोप लावा. या रोपाला खूप जास्त पाणी देऊ नये. मातीचा वरचा थर कोरडा पडल्यावरच पाणी टाका. तसेच ही कुंडी ६ ते ७ तास भरपूर ऊन मिळेल, अशा ठिकाणी ठेवा. एवढी काळजी घेतली तरी लवंगाचं रोप खूप बहरेल. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणीगच्चीतली बाग