Lokmat Sakhi >Gardening > प्लास्टिकच्या बाटलीत कोथिंबीर कशी लावायची? एक सोपी ट्रिक, १५ दिवसात येईल कोथिंबीर

प्लास्टिकच्या बाटलीत कोथिंबीर कशी लावायची? एक सोपी ट्रिक, १५ दिवसात येईल कोथिंबीर

How To Grow Coriander In A Water Bottle: A Step-By-Step Guide : महागड्या कोथिंबीरीच्या जुडीवर पैसे खर्च करण्यापेक्षा, घरात कोथिंबीर लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2023 06:21 PM2023-09-28T18:21:53+5:302023-09-28T18:22:52+5:30

How To Grow Coriander In A Water Bottle: A Step-By-Step Guide : महागड्या कोथिंबीरीच्या जुडीवर पैसे खर्च करण्यापेक्षा, घरात कोथिंबीर लावा

How To Grow Coriander In A Water Bottle: A Step-By-Step Guide | प्लास्टिकच्या बाटलीत कोथिंबीर कशी लावायची? एक सोपी ट्रिक, १५ दिवसात येईल कोथिंबीर

प्लास्टिकच्या बाटलीत कोथिंबीर कशी लावायची? एक सोपी ट्रिक, १५ दिवसात येईल कोथिंबीर

अनेकांना घरात बागकाम करण्याची आवड असते. फुलं, फळं, यासह काही लोकं घराबाहेरील मोकळ्या जागेत कोथिंबीरीची लागवड करतात. कोथिंबीरीची लागवड जास्त कठीण नसते. जर आपण फ्लॅट किंवा चाळीत राहत असाल, व कोथिंबीर (Coriander Leaves) उगवण्यासाठी पुरेशी जागा नसेल तर, बॉटलमध्ये कोथिंबीर लावा. घरातील प्लास्टिकच्या बाटलीमध्ये देखील कोथिंबीर उगवू शकते. कोथिंबीरीचा वापर पदार्थ सजवण्यासाठी होतो. पदार्थावर शेवटी कोथिंबीर भुरभुरून आपण डिश सर्व्ह करतो. जरी कोथिंबीर संपली तरी, आपण घरात लावलेल्या कोथिंबीरीचा वापर करू शकता. महागड्या कोथिंबीरीच्या जुडीवर पैसे खर्च करण्यापेक्षा, घरात ते प्लास्टिक बॉटलमध्ये कोथिंबीर लावा. ते जास्त फायद्याचं ठरू शकते(How To Grow Coriander In A Water Bottle: A Step-By-Step Guide).

प्लास्टिक बॉटलमध्ये कोथिंबीर लावण्याची सोपी पद्धत (How To Grow Coriander In A Water Bottle)

साहित्य

प्लास्टिकची बाटली

धणे

शिळा भात खाण्याचे २ फायदे, भात शिळा म्हणून नाक न मुरडता आनंदाने खा कारण..

एक कप सेंद्रिय खत

एक कप पाणी

प्लास्टिकची मोठी रिकामी बॉटल प्रत्येकाच्या घरात असते. ती मधोमध कापा. एका कपमध्ये धणे घ्या, त्यात पाणी घालून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळपर्यंत धणे पाण्यात भिजतील, व त्यांना मोड देखील येतील. त्यानंतर मोड आलेले धणे बॉटलमध्ये ठेवा. त्यावर सेंद्रिय खत आणि पाणी घाला.

उपमा कधी फडफडीत तर, कधी गचका होतो? साऊथ इंडियन स्टाईल उपमा करण्याची पाहा सोपी कृती

मात्र, दररोज पाणी घालायला विसरू नका. १० ते १५ दिवसात आपल्याला कोथिंबीर उगवलेली दिसून येईल. कोथिंबीर पूर्णपणे तयार झाल्यानंतर, त्यातून कोथिंबीर बाहेर काढा, व खत दुसऱ्या कुंडीत काढून ठेवा. प्लास्टिकची बॉटल धुवून पुन्हा आपण त्यात कोथिंबीरीची लागवड करू शकता.

Web Title: How To Grow Coriander In A Water Bottle: A Step-By-Step Guide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.