स्वंयपाकात कोथिंबीर नसली तर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. कोथिबींर अनेकदा सजावटी वापरली जाते. कारण कोथिंबीर घालताच पदार्थाला शोभा येते. (Gardening Tips) भाजीवाल्यांकडून आपण अनेकदा कोथिंबीर जास्त मागून घेतो, काही लोक जास्त भाजी विकत घेतल्यानंतर मोफत कोथिंबीर देतात. पण जेव्हा कोथिंबीरीचे भाव वाढतात तेव्हा कोथिंबीर कमीतकमी वापरावी लागते पण कधी कोथिंबीर स्वस्त होते तेव्हा कोथिंबीर वड्या बनवल्या जातात. (How To Grow Coriander Plant in Home)
कोथिंबीर घरच्याघरी लावणंसुद्धा अगदी सोपं आहे. यासाठी तुम्हाला कोणताही जास्तीचा खर्च करावा लागणार नाही. फक्त कोथिंबीर लावताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कमीत कमी वेळात कोथिंबीर घरी लावण्याची सोपी ट्रिक पाहूया. आपले डब्यातले धणे हेच कोथिंबिरीचं बी. ते किंचित भिजवून मग कुंडीत पेरा. चांगल्या प्रतीचे धणे पेरा म्हणजे छान सुगंधी कोथिंबीर उगवते.
कोथिंबीरीच्या रोपासाठी अशी जागा निवडा. ज्या ठिकाणी सकाळचा सुर्यप्रकाश येत असेल. कारण या सुर्यप्रकाशात जास्त उष्णता नसते. कोथिंबीर लावण्यासाठी तुम्ही जे भांडं निवडता त्याच्या तळाशी भरपूर छिद्र असतील असे पाहा. कोथिंबीरीसाठी सुपीक मातीची आवश्यकता असते. बियाणे पाण्यात भिजवून नंतर मातीत पेरा.
बिया लावण्याआधी एक काम करा
कोथिंबीर लवकर आणि वेगानं वाढवण्यासाठी धणे पेरताना लाटण्याचे किंचित रगडून घ्या. फार भुगा करायचा नाही. जरा दल वेगळे होतील असे करा. धण्यांची पावडर होणार नाही याची काळजी घ्या. धण्यांना किंचित मोड आले आणि मग पेरले की जास्त छान. कापडाने एकत्र बांधून एक पोटली तयार करा. नंतर ही पोटली पाण्यात भिजवून राख किंवा रेतीमध्ये ३ दिवस दाबून ठेवा. यादरम्यान पाणी शिंपडत राहा नंतर दाण्यांना मोड यायला वेळ लागणार नाही.
कोथिंबीर लावण्यासाठी कुंडीत समान प्रमाणात रेती, माती, शेण, कोकोपीट मिसळून भरा. ४ इंच भरलेलं असायला हवं. २ दिवस पाणी घालून मऊ होऊ द्या. नंतर यात धणे पेरा. रोज हलकं पाणी यावर शिंपडून फवारा मारा, लवकरच कोथिंबिरीची छोटी रोपं उगवतील. आणि काही दिवसात भाजीतही ताजी कोथिंबिर घालता येईल,