Join us

घरातल्या कुंडीत कडीपत्ता वाढतच नाही? त्यात घाला चमचाभर 'ही' पांढरी गोष्ट; मिळतील भरपूर सुगंधी पाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2024 14:24 IST

How to Grow Curry Leaves: 7 Steps : घरातच 'या' पद्धतीनं लावा हिरवागार कडीपत्ता

अनेक जण स्वयंपाकघरात कडीपत्ता वापरतात. कडीपत्ता खाण्याचे अनेक फायदे आहेत (Gardening Tips). कडीपत्त्यात अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह यासारखी खनिजे आढळतात (Curry Leaves). ज्याचा फायदा आरोग्याला पुरेपूर होतो. केस आणि त्वचाही यामुळे टवटवीत दिसते.

पण फ्रेश कडीपत्ता बाजारातून रोज आणणं शक्य होत नाही. त्यामुळे कधी कधी आपण सुकलेल्या कडीपत्त्याचाही वापर करतो. ज्यामुळे पदार्थाला हवी तशी चव येत नाही. पण आपण घरातल्या कुंडीतही कडीपत्त्याचे झाड लावू शकता. कडीपत्त्यासाठी आपल्याला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. अगदी काही दिवसात हिरवागार पानांनी कडीपत्त्याचे झाड फुलेल(How to Grow Curry Leaves: 7 Steps).

घरात कडीपत्त्याचे झाड लावताना लक्षात ठेवा ७ गोष्टी

- कडीपत्त्याच्या झाडातून नेहमी पिवळी पानं छाटून काढा. पिवळी आणि खराब झालेली पानं वेळीच काढल्याने नवीन पान उगवतात. शिवाय झाडही व्यवस्थित वाढते.

वजन कमी करायचं म्हणून साखर बंद करुन गुळ किंवा मध खाता? आहारतज्ज्ञ सांगतात, फायद्याचं नेमकं काय..

- कडीपत्त्याच्या कुंडीतल्या मातीत आपण कोकोपीट घालू शकता. कोकोपीट घालताच झाडाला पोषण मिळेल. शिवाय झाडाची योग्य वाढही होईल.

- आठवड्यातून एकदा झाडातल्या कुंडीत तांदुळाचे पाणी घाला. यामुळे झाडाला योग्य पोषण मिळेल, आणि पानंही भरभर वाढतील.

जिमसाठी वेळ नाही - तोंडावरचा ताबा सुटतो? फक्त 'एवढ्या' वेळासाठी वॉक करा; वजन वाढणार नाही याची ग्यारंटी

- कडीपत्त्याचे झाड थेट सूर्यप्रकाशाजवळ ठेवू नका. यामुळे कडीपत्त्याचे झाड खराब होऊ शकते. शिवाय पानांची व्यवस्थित वाढ होऊ शकणार नाही.

- कडीपत्त्याची वाढ सुधारण्यासाठी आपण एप्सम सॉल्टचा वापर करू शकता. यासाठी एक लिटर पाण्यात एक चमचा एप्सम सॉल्ट आणि मॅग्नेशियम सल्फेट मिसळून पाणी झाडावर फवारणी करा. यामुळे झाडाला बुरशी किंवा पानं खराब होणार नाहीत.

- कडीपत्त्याच्या झाडाला जास्त पाण्याची आवश्यकता नसते. त्यात गरजेनुसार पाणी घाला. जास्त पाणी घातल्याने रोप कुजण्याची शक्यता असते. 

टॅग्स :बागकाम टिप्ससोशल व्हायरल