Lokmat Sakhi >Gardening > स्वयंपाकात वापरा कुंडीतला ताजा कडीपत्ता, ५ गोष्टी - कुंडीतल्या कडीपत्त्याला येईल हिरवागार बहर

स्वयंपाकात वापरा कुंडीतला ताजा कडीपत्ता, ५ गोष्टी - कुंडीतल्या कडीपत्त्याला येईल हिरवागार बहर

how to grow curry leaves fast 5 gardening tips for curry patta plant : कडीपत्त्याला चांगला बहर यावा तो छान हिरवागार राहावा यासाठी या रोपाची काळजी कशी घ्यायची हे समजून घ्यायला हवे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2024 02:08 PM2024-10-09T14:08:57+5:302024-10-09T14:24:30+5:30

how to grow curry leaves fast 5 gardening tips for curry patta plant : कडीपत्त्याला चांगला बहर यावा तो छान हिरवागार राहावा यासाठी या रोपाची काळजी कशी घ्यायची हे समजून घ्यायला हवे.

how to grow curry leaves fast 5 gardening tips for curry patta plant : Use Fresh curry leaves in Cooking, 5 Things - curry Leaves in Pots Will Bloom Green | स्वयंपाकात वापरा कुंडीतला ताजा कडीपत्ता, ५ गोष्टी - कुंडीतल्या कडीपत्त्याला येईल हिरवागार बहर

स्वयंपाकात वापरा कुंडीतला ताजा कडीपत्ता, ५ गोष्टी - कुंडीतल्या कडीपत्त्याला येईल हिरवागार बहर

स्वयंपाक करताना कडीपत्ता असेल तर पदार्थाला मस्त स्वाद आणि चव येते. अगदी पोहे, भाजी, कोशिंबीरीपासून ते कढीपर्यंत सगळ्या पदार्थांसाठी आपण आवर्जून कडीपत्ता वापरतो. कडीपत्त्याची चटणी खाणेही हाडांच्या आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. त्यामुळे पदार्थांमधला कडीपत्ता काढून न टाकता तो खायला हवा असं डॉक्टरही सांगतात. आरोग्याच्या विविध तक्रारींबरोबरच  केसांसाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी कडीपत्ता फायदेशीर ठरतो. असा हा हिरवागार कडीपत्ता बाजारातून आणला की २ दिवसांत वाळून जातो (how to grow curry leaves fast 5 gardening tips for curry patta plant). 

वाळलेल्या कडीपत्त्याचा वास आणि चव दोन्हीही निघून जाते त्यामुळे तो टाकू द्यावा लागतो. पण आपल्या घरातील कुंडीत कडीपत्त्याचे लहानसे रोप लावले तर आपल्याला स्वयंपाक करताना ताजा कडीपत्ता तोडून वापरता येऊ शकतो. हे जरी खरे असले तरी कडीपत्त्याचे रोप लावल्यानंतर त्याला म्हणावा तसा बहर येतोच असे नाही, बरेचदा हे रोप सुकून जाते. असे होऊ नये आणि कडीपत्त्याला चांगला बहर यावा तो छान हिरवागार राहावा यासाठी या रोपाची काळजी कशी घ्यायची हे समजून घ्यायला हवे. यासाठीच काही सोप्या टिप्स पाहूयात..

(Image : Google)
(Image : Google)

१. कडीपत्त्याचे रोप थेट सूर्य प्रकाशात ठेवावे. रोपाला हा थेट प्रकाश किमान २ ते ३ तास मिळायला हवा तर किमान ४ तास नेहमीचा प्रकाश मिळायला हवा. यामुळे कडीपत्ता छान हिरवागार बहरण्यास मदत होते. 

२. आपण कोणतंही रोप लावताना साधारणपणे मातीमध्ये लावतो. पण कडीपत्ता भरभर वाढावा असं वाटत असेल तर नेहमीची माती वापरण्यापेक्षा या मातीत कंपोस्ट खत, कोकोपीट यांसारख्या गोष्टी समान प्रमाणात मिसळायला हव्यात. 

३. कडीपत्त्याला थोडी जास्त पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे या रोपाला रोजच्या रोज न चुकता व्यवस्थित पाणी घाला. पाणी घालताना वरची माती कितपत कोरडी पडली हे तपासा आणि त्याप्रमाणे अंदाज घेत पाण्याचे प्रमाण ठरवा.

४. कोणतीही रोपं छाटणी किंवा कटींग केल्यावर जास्त चांगली बहरतात. त्याचप्रमाणे कडीपत्त्याच्या रोपाचीही नियमितपणे छाटणी करायला हवी. फांद्या फुटतात त्याठिकाणी नीट छाटणी केली तर रोपाची झपाट्याने वाढ होते. सुकलेल्या फांद्या कापल्या तर आहेत त्या फांद्यांना आणि पानांना चांगले पोषण मिळण्यास मदत होते. 

५. मातीमध्ये मँग्नेशियमचे प्रमाण चांगले असेल तर कडीपत्त्याचे रोप चांगले वाढते. यासाठी मातीमध्ये इप्सम सॉल्ट घालायला हवे. साधारण २ लीटर पाण्यामध्ये १ चमचा इप्सम सॉल्ट घालावे. हे पाणी रोपाला देत राहावे. हा प्रयोग महिन्यातून एकदाच करावा. यामुळे कडीपत्ता चांगला बहरतो. 

Web Title: how to grow curry leaves fast 5 gardening tips for curry patta plant : Use Fresh curry leaves in Cooking, 5 Things - curry Leaves in Pots Will Bloom Green

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.