Join us

उन्हाळा सुरू होताच कढीपत्त्याच्या झाडाची वाढ खुंटली? 'हा' एक उपाय झाडासाठी फायद्याचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 19:45 IST

Gardening Tips : उन्हाळ्यात किंवा काही कारणानं या झाडाची वाढ खुंटते. या झाडाची वाढ खुंटू नये म्हणून आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. यात सगळ्यात महत्वाचं ठरतं ते तांदळाचं पाणी.

Gardening Tips : उन्हाळा आला की, घराच्या बाल्कनीमध्ये किंवा कुंड्यांमध्ये लावलेल्या झाडांची काळजी घेण्याचं टेंशन सगळ्यांनाच येतं. कारण उन्हामुळे आणि वाढलेल्या तापमानामुळे झाडं खराब होतात. अनेकांच्या घरात कढीपत्त्याचं झाड नक्कीच असतं. कढीपत्त्याचा वापर रोज वेगवेगळ्या पदार्थांसाठी केला जातो, सोबतच यानं घरातील हवाही शुद्ध राहते. पण उन्हाळ्यात किंवा काही कारणानं या झाडाची वाढ खुंटते. या झाडाची वाढ खुंटू नये म्हणून आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. यात सगळ्यात महत्वाचं ठरतं ते तांदळाचं पाणी.

तांदळाचं पाणी

जर कढीपत्त्याच्या झाडाची चांगली वाढ व्हावी असं वाटत असेल तर  त्यात तुम्ही नियमितपणे तांदूळ धुतल्यानंतर जे पाणी शिल्लक राहतं ते टाकायला हवं. आठवड्यातून किमान एकदा तांदळाचं पाणी या झाडाला टाकायला हवं. यासाठी तांदूळ साधारण एक तास पाण्यात भिजवा. नंतर हे पाणी गाळू झाडाला टाका. नंतर माती जरा उखरून घ्या.

इतरही काही उपाय

सामान्यपणे कोणतंही झाड हे ऋतुनुसार आपली वाढ करत असतं. हिवाळ्यात इतर झाडांच्या तुलनेत कढीपत्त्याची वाढ थांबते. अशात झाडांना जास्त फर्टिलायजर देणं किंवा जास्त पाणी टाकणं ठीक नाही. उन्हाळ्यात कढीपत्त्याच्या झाडांना जास्त उन्ह लागणार नाही याची काळजी घ्या आणि दुपारी पाणी टाकू नका.

कसं ठेवाल हिरवंगार झाड

हिवाळा संपता संपता फेब्रुवारी महिन्यात कढीपत्त्याला फुलं येतात. त्यामुळे झाडाच्या वाढीवर प्रभाव पडतो. जर झाडांची वाढ चांगली करायची असेल तर फुलांच्या वरची फांदी कापून टाका. असं केल्यास नवीन फांद्या वाढतील.

मजबूत आणि चमकदार केस

त्वचेसोबतच तांदळाचं पाणी केसांसाठी खूप फायदेशीर ठरतं. शाम्पू केल्यानंतर तांदळाच्या पाण्यानं केस धुतल्यास केस मुलायम, चमकदार होतील. तसेच या पाण्यानं डोक्याच्या त्वचेला पोषणही मिळतं. केसगळती, केस तुटणे अशा समस्याही दूर होतात.

कोणतं खत टाकावं?

कढीपत्याचं झाड लावताना कुंडीमध्ये कोकोपीट, वर्मी कम्पोस्ट आणि मातीचं मिश्रण तयार करा. हे टाकल्यास झाडाची वाढ चांगली होईल. माती सुकल्यावर झाडाला पाणी टाकत रहा. यामुळे झाड हिरवंगार राहण्यास मदत मिळेल.

टॅग्स :बागकाम टिप्ससोशल व्हायरल