Lokmat Sakhi >Gardening > छोट्याशा कुंडीतही रुजते कढीपत्त्याचे रोप, हिरवागार-ताजा-सुगंधी कढीपत्ता पटकन घाला फोडणीत!

छोट्याशा कुंडीतही रुजते कढीपत्त्याचे रोप, हिरवागार-ताजा-सुगंधी कढीपत्ता पटकन घाला फोडणीत!

Growing Curry Leaves In A Bottle : आपल्या बाल्कनीतही कढीपत्त्याचे छोटूसे रोप छान वाढू शकते, पाहा कशी करायची मशागत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2024 07:09 PM2024-07-15T19:09:31+5:302024-07-15T19:11:44+5:30

Growing Curry Leaves In A Bottle : आपल्या बाल्कनीतही कढीपत्त्याचे छोटूसे रोप छान वाढू शकते, पाहा कशी करायची मशागत...

How To Grow Curry Leaves In A Bottle How To Grow Curry Leaf Plant From Cuttings Using Rooting | छोट्याशा कुंडीतही रुजते कढीपत्त्याचे रोप, हिरवागार-ताजा-सुगंधी कढीपत्ता पटकन घाला फोडणीत!

छोट्याशा कुंडीतही रुजते कढीपत्त्याचे रोप, हिरवागार-ताजा-सुगंधी कढीपत्ता पटकन घाला फोडणीत!

कढीपत्ता हा रोजच्या जेवणात लागतोच. कोणत्याही पदार्थाला फोडणी द्यायची म्हटलं की कढीपत्ता आपण वापरतो. कढीपत्त्याशिवाय फोडणी अधुरीच आहे. कढीपत्त्यात अनेक औषधी गुणधर्म असतात, जे आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी उपयुक्त ठरतात. कढीपत्त्याचा नियमित वापर केल्याने केस आणि त्वचेच्या पोषणासोबतच शरीरही आतून तंदुरुस्त राहते. कढीपत्त्याला त्याचा विषेश असा सुगंध आणि चव असते त्यामुळे तो स्वयंपाकात आवर्जून वापरला जातो(How To Grow Curry Leaves In A Bottle).

कढी, डाळ, भाजी, आमटी आणि सांबार सारखे पदार्थ तयार करण्यासाठी याचा उपयोग हमखास केला जातो. कढीपत्त्याच्या पानांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात म्हणूनच याला सुपरफूड मानले जाते. कढीपत्त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अनेक पोषक घटक असतात. असा हा बहुगुणी व फायदेशीर कढीपत्ता आपण बाजारांतून नेहमी विकत आणतो. परंतु हा कढीपत्ता रोजच लागतो त्यामुळे आपण आपल्या घरच्या बाल्कनीत याचे सुंदरसे रोपटे लावू शकतो. कढीपत्त्याच्या मुळांचा वापर करून आपण त्यापासून नवीन रोपटे लावू शकतो. ते कसे लावावे याची सोपी पद्धत पाहूयात(Growing Curry Leaves In A Bottle).

साहित्य :- 

१. कढीपत्त्याचे रोपं - (साधारणपणे ४ ते ६ इंच लांब असलेले रोपं) 
२. माती 
३. पाणी 
४. एक स्वच्छ बाटली (शक्यतो काचेची बाटली वापरावी) 
५. ओली वाळू 

पावसाळ्यात फ्लोअर मॅटचा कुबट वास त्रासदायक, न धुता फ्लोअर मॅट स्वच्छ करण्याचे ६ उपाय..

कढीपत्त्याच्या देटांचा वापर करुन कढीपत्त्याचे रोपं तयार करण्याची कृती :- 

१. सर्वातआधी एक चांगले कढीपत्त्याचे रोपं घ्यावे. या रोपाची मूळ काढून घ्यावीत. ( मूळ किमान ४ ते ६ इंच लांब असावीत व २ ते ३ देट असावेत). 
२. या रोपांची पाने हिरवीगार असावीत तसेच रोपांच्या मुळांना कोणत्याही प्रकारचा रोग नसल्याची खात्री करुन घ्यावीत. 
३. सगळ्यात आधी बाटली स्वच्छ धुवून ती आतून संपूर्णपणे कोरडी करून घ्यावी. 
४. या बाटलीच्या तळाशी आपण आकाराने लहान असलेले दगड देखील घालू शकता. 
५. आता बाटलीच्या तळाशी समप्रमाणात ओली वाळू व माती यांचे एकत्रित मिश्रण घालूंन घ्यावे. बाटलीचा ३/४ भाग हा या मिश्रणाने भरुन घ्यावा.  
६. त्यानंतर या मिश्रणात कढीपत्त्याच्या मुळांना व्यवस्थित लावून घ्यावे. मग किंचित पाणी घालावे. 
७. ही काचेची बाटली उन्हात ठेवून द्यावी. त्यानंतर रोज या रोपाला थोडे थोडे पाणी देत राहा. जास्त पाणी घालून माती ओली करु नये. एक महिन्यानंतर या रोपाला खत घालावे.  

इवलेसे लालचुटुक फळं पण आरोग्यासाठी ठरते वरदान! पाहा चेरी खाण्याचे६ फायदे... 

कढीपत्त्याचे रोपं लावताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ? 

१. तुम्ही एकाच बाटलीत एकापेक्षा जास्त कढीपत्त्याची रोपे लावू शकता, परंतु यासाठी बाटली आकाराने मोठी घ्यावी. 
२. जर तुमच्या बाटलीला झाकण नसेल, तर तुम्ही ती प्लास्टिकच्या पिशवीने झाकून ठेवू शकता. यामुळे ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते. 
३. बाटलीचे झाकण एकदम गच्च लावू नका,  थोडं मोकळं ठेवा, म्हणजे हवा आत - बाहेर येऊ शकेल.
४. तुम्ही तुमच्या बाटलीला अधिक आकर्षक बनवण्यासाठी सजावटीचे दगड किंवा बाटलीवर पेंट देखील करु शकता.

Web Title: How To Grow Curry Leaves In A Bottle How To Grow Curry Leaf Plant From Cuttings Using Rooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.