गार्डनिंगची आवड बऱ्याच जणींना असते. फुलझाडं, शोभेची झाडं आपण लावतोच, पण त्यातही किचन गार्डनिंग ही संकल्पना हल्ली खूप वाढत चालली आहे. ज्यांच्याकडे थोडी मोकळी जागा असते त्या कोथिंबीर, पुदिना, मिरची, टोमॅटो, मेथी अशा भाज्या घरच्या बागेत फुलविण्याचा प्रयत्न करतात. पण बऱ्याचदा असं लक्षात येतं की या भाज्या आपण जेव्हा प्रत्यक्षात लावतो, तेव्हा त्यांची हवी तशी वाढ होत नाही. त्यांच्यावर रोग पडतो किंवा ते रोप तसंच सुकून जळून जातं. घरच्याघरी कोथिंबीर लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक जणींना असा अनुभव आलाच असेल (Gardening Tips For Growing Dhaniya Or Coriander Plant). कोथिंबीर आपल्याला रोजच्या रोज थोडी का होईना पण लागतेच. त्यासाठी तुम्हीही घरच्या बागेत कोथिंबीर लावण्याचा प्रयत्न करणार असाल तर या काही टिप्स पाहून घ्या.. छोट्याशा कुंडीतही अगदी भरभरून कोथिंबीर येईल..(how to grow dhaniya or coriander in terrace garden?)
कुंडीमध्ये कोथिंबीर लावताना काय काळजी घ्यावी?
कुंडीमध्ये कोथिंबीर लावणार असाल तर त्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या टाळाव्या, याविषयी माहिती देणारा एक व्हिडिओ urbanhomevibes या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
१. यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की ऑक्टोबरएंडपासून कोथिंबीरीसाठी खूपच पोषक वातावरण निर्माण होते. १५ ते २७ डिग्री सेल्सियस तापमानात कोथिंबीर खूप जोमाने येते. त्यामुळे त्याची तयारी आतापासूनच सुरू करा.
मुलं अभ्यासाला बसायला टाळाटाळ करतात? ५ गोष्टी करून पाहा- भरपूर वेळ मन लावून अभ्यास करतील..
२. कोथिंबीर ज्या कुंडीमध्ये लावायची आहे त्या मातीमध्ये कंपोस्ट, गांडूळ खत घालून ती थोडी भुसभुशीत करून ठेवा.
३. त्यानंतर कोथिंबीर लावण्यासाठी उत्तम दर्जाचे धणे घ्या. धणे स्वच्छ धुवून २ दिवस पाण्यात भिजत घाला. त्यानंतर ते मातीमध्ये टाका.
४. धणे मातीमध्ये टाकल्यानंतर कुंडीमध्ये नियमितपणे पाणी घालून कुंडीतली माती नेहमीच ओलसर राहील याची काळजी घ्या.
किचनच्या सिंकमधून घाणेरडा वास येतो? ३ पदार्थ वापरून करा 'हा' उपाय, दुर्गंधी गायब- सिंक चकाचक
५. ही कुंडी खूप उन्हात तसेच खूप सावलीत ठेवू नये. थंड वातावरण जरी लागत असलं तरी त्याला ३ ते ४ तास ऊन मिळणं गरजेचं आहे. या ५ गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच तुमच्या बागेत भरभरून कोथिंबीर येईल. तुम्हाला किमान हिवाळ्यात तरी कोथिंबीर विकत घेण्याची गरज पडणार नाही.