Lokmat Sakhi >Gardening > बघा छोट्याशा कुंडीत कशी लावायची कोथिंबीर, एकदम सोपी पद्धत- रोजच खाता येईल घरची ताजी कोथिंबीर

बघा छोट्याशा कुंडीत कशी लावायची कोथिंबीर, एकदम सोपी पद्धत- रोजच खाता येईल घरची ताजी कोथिंबीर

How to Grow Dhaniya In a Small Pot: फक्त ३ गोष्टी लक्षात ठेवा, घरच्याघरी एखाद्या कुंडीत कोथिंबीर (kothimbir) लावणं अगदी सोपं आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2023 01:27 PM2023-10-30T13:27:23+5:302023-10-30T13:28:14+5:30

How to Grow Dhaniya In a Small Pot: फक्त ३ गोष्टी लक्षात ठेवा, घरच्याघरी एखाद्या कुंडीत कोथिंबीर (kothimbir) लावणं अगदी सोपं आहे.

How to grow dhaniya or kothimbir in a small pot, Gardening tips for dhaniya | बघा छोट्याशा कुंडीत कशी लावायची कोथिंबीर, एकदम सोपी पद्धत- रोजच खाता येईल घरची ताजी कोथिंबीर

बघा छोट्याशा कुंडीत कशी लावायची कोथिंबीर, एकदम सोपी पद्धत- रोजच खाता येईल घरची ताजी कोथिंबीर

Highlightsकोथिंबीची जुडी आणून ती २- ३ दिवस वापरण्यापेक्षा घरच्याघरी कुंडीतच कोथिंबीर लावून टाका आणि रोजच्या रोज ताजी कोथिंबीर खा.

भाजी असो, वरण असो, कढी असो किंवा इतर कोणताही पदार्थ असो... बहुतांश सगळ्या रेसिपींसोबत सगळ्यात चांगलं सूत जमतं ते कोथिंबीरीचं. कोथिंबीरीची मस्त पेरणी केली की तिच्या सोबतीने कोणत्याही पदार्थाचा स्वाद आणखीनच खुलून येतो. त्यामुळे रोजच्या स्वयंपाकात थोडी तरी कोथिंबीर लागतेच लागते. कोथिंबीर नसली तर सगळा स्वयंपाक कसा फिका- फिका वाटतो. त्यातही कोथिंबीर एकदम फ्रेश- ताजी असेल तर मग तिचा स्वाद काही वेगळाच असतो. म्हणूनच आता बाजारात जाऊन किंवा भाजीवालीकडून कोथिंबीची जुडी आणून ती २- ३ दिवस वापरण्यापेक्षा घरच्याघरी कुंडीतच कोथिंबीर लावून टाका आणि रोजच्या रोज ताजी कोथिंबीर खा.(How to grow dhaniya or kothimbir in a small pot)

 

कुंडीमध्ये कशी लावायची कोथिंबीर?

कुंडीमध्ये कोथिंबीर लावणं एकदम सोपं आहे. इतर कोणतंही रोप तुम्ही जसं लावता, तशीच कोथिंबीर लावण्याची पद्धत आहे. पण फक्त त्यासाठी ३ प्रमुख गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. याविषयीचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या mudandcolors या पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

आईस फेशियल! त्वचा तरुण ठेवण्यासाठी स्वस्तात मस्त उपाय- पण करताना मात्र 'ही' गोष्ट लक्षात ठेवा, नाहीतर.....

धण्याचा वापर करून कोथिंबीर कशी लावायची ते पाहूया.. यासाठी कोणत्याही किराणा दुकानातून धणे विकत आणा. कोथिंबीर लावण्यासाठी आकाराने थोडे लहान असणारे धणे वापरावेत. तसेच कुंडी पसरट असावी. 

१० मिनिटांत करा क्रिस्पी- क्रंची पनीर कुरकुरे... कुणाल कपूर यांची खास रेसिपी- एकदा खाऊन बघाच

सगळ्यात आधी धणे हलक्या हाताने थोडे क्रश करून घ्या. हे करताना धण्यांचा भुसा होणार नाही, याची मात्र काळजी घ्या. हे क्रश केलेले धणे आपल्याला कुंडीत पेरायचे आहेत. 

 

कोथिंबीर लावण्यासाठी माती खूप चिकट असू नये. त्यामुळे कुंडीतली माती चिकट असेल तर त्यात थोडी वाळू टाका आणि माती भुसभुशीत करून घ्या. त्यात थोडं पाणी शिंपडून ती ओलसर करून घ्या. 

शाकाहारी असलेला विराट कोहली प्रोटीनसाठी सध्या काय खातो? कुठून येते त्याच्यात एवढी ताकद?

त्यानंतर कुंडीतल्या मातीत थोड्या थोड्या अंतराने बोटभर छिद्रे करून घ्या. आपल्या हाताच्या तीन बोटांमध्ये जेवढे धणे मावतील तेवढे धणे एकेका छिद्रात टाकावे. आणि पाणी शिंपडावे. काही दिवसांतच छान कोथिंबीर उगवेल. कोथिंबीर कधीही मुळापासून तोडू नका. 


 

Web Title: How to grow dhaniya or kothimbir in a small pot, Gardening tips for dhaniya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.