Lokmat Sakhi >Gardening > कुंडीत दुर्वा लावण्याची पाहा सोपी ट्रिक, छोट्याशा कुंडीतही वाढेल दाट हिरवळ-देवाला वाहा ताज्या दुर्वा!

कुंडीत दुर्वा लावण्याची पाहा सोपी ट्रिक, छोट्याशा कुंडीतही वाढेल दाट हिरवळ-देवाला वाहा ताज्या दुर्वा!

How To Grow Durva Grass At Home Garden : How To Grow Durva Doob Grass At Home : आपण लहान जागेत, लहान कुंडीतही हिरव्यागार दुर्वा लावूच शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2024 09:00 AM2024-12-10T09:00:30+5:302024-12-10T09:05:01+5:30

How To Grow Durva Grass At Home Garden : How To Grow Durva Doob Grass At Home : आपण लहान जागेत, लहान कुंडीतही हिरव्यागार दुर्वा लावूच शकतो.

How To Grow Durva Grass At Home Garden How To Grow Durva Doob Grass At Home | कुंडीत दुर्वा लावण्याची पाहा सोपी ट्रिक, छोट्याशा कुंडीतही वाढेल दाट हिरवळ-देवाला वाहा ताज्या दुर्वा!

कुंडीत दुर्वा लावण्याची पाहा सोपी ट्रिक, छोट्याशा कुंडीतही वाढेल दाट हिरवळ-देवाला वाहा ताज्या दुर्वा!

श्रीगणेशाच्या पूजेमध्ये दुर्वांना फार मोठे महत्त्व आणि मानाचे स्थान आहे. गणपती बाप्पाच्या पुजेमध्ये आपण फुले, अष्टगंध, गुलाल, दुर्वा आणि इतर पाने फुले असे विविध स्वरूपाचे साहित्य वापरत असतो. यामध्ये दुर्वा (How To Grow Durva Doob Grass At Home ) ह्या गणपतीला जास्त आवडतात. गणपतीला २१ दुर्वांची जुडी वाहिली जाते. रोजची गणपतीची पूजा असो किंवा गणेशचतुर्थी आपण गणपती बाप्पाला आवर्जून जास्वंदीचे फुल आणि दुर्वा वाहतोच. त्याच दुर्वा विकत न आणता आपल्या कुंडीतही छान येऊ शकतात(How To Grow Durva Grass At Home Garden).

गणपती बाप्पाला आवडणाऱ्या या दुर्वा आपण हार-फुलांसोबतच विकत आणतो. परंतु या विकत आणलेल्या दुर्वा काहीवेळा सुकलेल्या असतात किंवा फ्रेश नसतात. यासाठी गणपती बाप्पाला आवडणाऱ्या दुर्वा आपण घराच्या बाल्कनीत किंवा गार्डनमध्ये लावू शकतो.  रोजच्या रोज फ्रेश ताज्या निवडून आणलेल्या दुर्वा आपण गणपती बाप्पाला वाहू शकतो. घरच्याघरीच कुंड्यांमध्ये दुर्वा कशा लावाव्यात आणि त्यांची काळजी कशी घ्यावी याच्या काही खास टिप्स पाहूयात.

घरच्या घरीच कुंडीत दुर्वा कशी लावावी ?

घरच्या घरीच दुर्वा लावताना सर्वात आधी थोडे पसरट भांडे किंवा कुंडी घ्यावी. या भांड्याच्या तळाशी ३ ते ४ मोठी छिद्र करुन घ्यावीत. त्यानंतर या भांड्यात माती पसरवून भरून घ्यावी. त्यानंतर या पसरट भांड्यात मातीत एका काठीच्या मदतीने छोटे छोटे छिद्र करून घ्यावेत. या छिद्रांत दुर्वा उभ्या खोचून लावून घ्याव्यात. दुर्वा नवीन कोवळ्या न घेता शक्यतो थोड्या जून आणि मूळ असणाऱ्या दुर्वा घ्याव्यात. इतक्या सहजसोप्या पद्धतीने आपण घरच्या घरीच झटपट कुंडीत दुर्वा उगवू शकतो.   

कुंडीतल्या रोपांसाठी केमिकल्सयुक्त कीटकनाशक नको, करा १ घरगुती उपाय, कीड होईल गायब...

घरच्या कुंडीत दुर्वा लावताना अशी घ्या काळजी... 

१. माती आणि कुंडीची योग्य निवड :- दुर्वा हे एक प्रकारचे गवतच असते. त्यामुळे हे गवत लांब आणि पसरट पद्धतीने वाढते. यासाठी दुर्वा कुंडीत लावणार असाल तर गोलाकार निमुळत्या कुंडीचा वापर न करता पसरट आणि शक्यतो आकाराने मोठ्या कुंड्यांची निवड करावी. यामुळे दुर्वांच्या वाढीसाठी कुंडीत बरीच मोकळी आणि पसरट जागा मिळते. यामुळे दुर्वा अतिशय चांगल्या पद्धतीने वाढतात. कुंडीसोबतच मातीची निवड देखील योग्य असावी. दुर्वांच्या वाढीसाठी कोणतीही माती चालते. अमुक एका विशेष प्रकारचीच माती असायला हवी अशी गरज नसते. त्यामुळे आपण इतर रोपांसाठी जी माती वापरतो त्याच मातीचा वापर दुर्वांसाठी करावा.    

२. दुर्वा कटिंग करून लावाव्यात :- एखाद्या गार्डनमध्ये उगवलेल्या दुर्वा मुळांसकट कटिंग करुन आणून त्या घरच्या कुंडीत लावाव्यात. याचबरोबर, आपण दुर्वांच्या बिया कुंडीत पेरुन देखील दुर्वा घरच्याघरीच उगवू शकतो. दुर्वांच्या बिया आपल्याला बाजारांत किंवा रोपांच्या नर्सरीमध्ये अगदी सहज विकत मिळतील. कटिंग करुन आणलेल्या दुर्वांच्या मुळ्या कुंडीत लावून त्यांना पाणी घालावे. याचबरोबर १५ दिवसातून एकदा या दुर्वांना हळदीचे पाणी घालावे यामुळे दुर्वांची वाढ छान होते सोबतच त्यांना हिरवागार रंग येण्यास अधिक मदत होते. 

कावळे -कबुतर कुंडीतील रोपांची नासधूस करतात? करा एक भन्नाट घरगुती युक्ती, रोपं राहतील सुरक्षित...

३. अशी घ्या काळजी :- जर आपण कुंडीत दुर्वांच्या बिया पेरुन लावल्या असतील तर दुर्वा रुजून उगवून यायला ७ ते २१ दिवसांचा कालावधी लागतो. कुंडीत बिया लावल्यानंतर ही कुंडी १८ से २४ डिग्री सेल्सियस तापमानात थोड्या वेळासाठी ठेवावी. दुर्वांना रोज पुरेसे पाणी घालावे तसेच दुर्वा लावलेली कुंडी पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी ठेवावी. जेणेकरून, दुर्वांची वाढ अतिशय भरभर आणि चांगली होईल.

Web Title: How To Grow Durva Grass At Home Garden How To Grow Durva Doob Grass At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.