Join us  

कुंडीमधला गवती चहा नीट वाढतच नाही- पानं पिवळी पडतात? २ गोष्टी करा- गवती चहा वाढेल भराभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2024 9:05 AM

How To Grow Gavati Chaha Or Lemon Grass In Terrace: तुमच्या बागेतल्या कुंडीमध्ये गवती चहा लावायचा असेल तर या काही साध्या सोप्या गोष्टी लक्षात ठेवा....(gardening tips) 

ठळक मुद्देबागेतल्या कुंडीत गवती चहा कसा लावायचा आणि त्याची कशी काळजी घ्यायची ते पाहूया...

आपल्या छोट्याशा बागेत आपण हौशीने काही फुलझाडं लावतो, काही शो ची झाडं लावतो. त्याचप्रमाणे कढीपत्ता, पुदिना, गवतीचहा अशी आपल्याला रोजच उपयोगी पडतील अशीही काही रोपं लावतो. आता बऱ्याचदा आपल्याला या झाडांच्या ऊन- सावलीचं गणित माहिती नसतं. त्यामुळे मग ही रोपं आपण लावली तरी नीट वाढत नाहीत. गवती चहाच्या म्हणजेच लेमन ग्रासच्या बाबतीतही अनेकांचा हाच अनुभव आहे (gardening tips for growing lemon grass or gavati chaha). म्हणूनच आता बागेतल्या कुंडीत गवती चहा कसा लावायचा आणि त्याची कशी काळजी घ्यायची ते पाहूया... (2 simple tricks and tips for growing lemon grass)

 

कुंडीमध्ये गवती चहा कसा लावायचा?

आपल्याला माहितीच आहे की गवती चहा जर आपल्याला कुंडीमध्ये लावायचा असेल तर त्यासाठी त्याचा कंद आणणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या गावातल्या नर्सरीमध्ये किंवा ज्यांच्याकडे गवती चहा आधीपासूनच आहे, त्यांच्याकडून गवती चहाचे दोन- तीन कंद आणा.

हेअरस्टाईल कशी करावी?- सई ताम्हणकरकडून घ्या खास टिप्स

गवती चहाच्या बाबतीतली सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे गवती चहा लावण्यासाठी थोडी पसरट आकाराची कुंडी घ्यावी. कारण गवती चहाची वाढ खूप भराभर होते आणि तो पसरत जातो. त्यामुळे कुंडीची उंची कमी असली तरी ती पसरट असावी.

आता कुंडीतल्या मातीत थोडं शेणखत आणि गांडूळ खत टाका. मातीचे प्रमाण ७० टक्के असेल तर शेणखत किंवा गांडूळ खत ३० टक्के असावे. तसेच कुंडीतली माती थोडी भुसभुशीत ठेवा.

 

यानंतर आता ५ ते ७ सेमी खोल खड्डा करा आणि त्यात गवती चहाचा कंद अलगद खोचा. या कंदाच्या मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्या. असे कुंडीत ठिकठिकाणी २- ३ कंद खोचून द्या आणि त्यांना थोडे पाणी द्या.

कोलेस्ट्राॅल वाढणार नाही- तब्येतही राहील एकदम ठणठणीत, फक्त 'या' ७ गोष्टी करा- फिट राहाल

गवती चहाच्या बाबतीतली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गवती चहाला ऊन गरजेचे आहे. त्यामुळे जिथे ४ ते ५ तास चांगले ऊन येईल, अशा ठिकाणी गवती चहाची कुंडी ठेवावी. तरच त्याची चांगली वाढ होईल आणि पाने पिवळी पडणार नाहीत. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सगच्चीतली बागइनडोअर प्लाण्ट्सपाणी