Lokmat Sakhi >Gardening > छोट्याशा कुंडीत लावा हिरव्या मिरचीचं रोप- पाहा ताकाचा सोपा उपाय; मिरच्याच मिरच्या, डवरेल झाड

छोट्याशा कुंडीत लावा हिरव्या मिरचीचं रोप- पाहा ताकाचा सोपा उपाय; मिरच्याच मिरच्या, डवरेल झाड

How to grow Green chilli plant in pot : मिरचीच्या रोपाची अशी काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2024 06:44 PM2024-11-07T18:44:31+5:302024-11-07T18:46:50+5:30

How to grow Green chilli plant in pot : मिरचीच्या रोपाची अशी काळजी घ्या

How to grow Green chilli plant in pot | छोट्याशा कुंडीत लावा हिरव्या मिरचीचं रोप- पाहा ताकाचा सोपा उपाय; मिरच्याच मिरच्या, डवरेल झाड

छोट्याशा कुंडीत लावा हिरव्या मिरचीचं रोप- पाहा ताकाचा सोपा उपाय; मिरच्याच मिरच्या, डवरेल झाड

भारतीय स्वयंपाकामध्ये हिरवी मिरचीचा (Green Chilli) वापर होतोच. तिखट - झणझणीत जेवण बनवण्यासाठी हिरवी मिरची लागतेच. हिरवी मिरचीमुळे पदार्थाची चव वाढते (Gardening Tips). हिरवी मिरची खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. रोजच्या स्वयंपाकामध्ये मिरची सर्रास वापर केला जातो. बऱ्याचदा असे होते की बाजारातून आणलेल्या मिरच्या संपतात आणि ऐनवेळी मिरची आणण्यासाठी पुन्हा बाजारात जावे लागते. अशावेळी घरातच मिरचीचे रोप असेल तर खूप उपयोगी ठरते.

घरातल्या कुंडीत जर आपण हिरवी मिरचीचे रोप लावले तर, आपण कधीही तोडून हिरवी मिरचीचा वापर स्वयंपाकात करू शकता. पण कुंडीतल्या मातीत हिरव्या मिरचीची लागवड कधी कधी होत नाही. पानं वाढतात, पण हिरव्या मिरचीची वाढ होत नाही. अशावेळी आपण खत म्हणून ताकाचा वापर करू शकता(How to grow Green chilli plant in pot).

लहान मुलांना खाऊ देऊ नका २ गोष्टी, तरुणपणी डायबिटिस आणि लठ्ठपणाचा धोका छळेल..

हिरव्या मिरचीच्या लागवडीसाठी घरगुती खत

- जर हिरव्या मिरचीच्या झाडावर फक्त पानांची वाढ होत असेल आणि हिरव्या मिरचीची होत नसेल तर, यावर उपाय म्हणून आपण ताकाचाही वापर करू शकता.

- ताकाच्या वापराने कुंडीतल्या झाडामध्ये भरपूर हिरव्या मिरच्या येतील. यासाठी आपल्याला केमिकल रसायनांची गरज नाही. ताकाच्या वापरानेही झाडाला भरपूर हिरव्या मिरच्या येतील.

- यासाठी सर्वात आधी 100 ग्रॅम ताक घेऊन तीन ते चार दिवस ठेवा. यानंतर ते कापड किंवा गाळणीच्या साहाय्याने गाळून 1 लिटर पाण्यात मिसळून झाडांवर शिंपडा.

५ गोष्टींचा त्रास असेल तर कोमट पाणी कधीच पिऊ नका; वजन कमी करण्याच्या नाद पडेल महागात

- ताकाच्या या खतामुळे झाडांवर भरपूर हिरव्या मिरच्या येतील.

- शिवाय आपण ताकापासून बनलेल्या खताचा वापर महिन्यातून २ वेळा करू शकता. यामुळे झाडाला नेहमी हिरव्या मिरची लागतील. 

Web Title: How to grow Green chilli plant in pot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.