घराच्या बाल्कनीत रोपं, फुल झाडं असतील घरातील वातावरण सकारात्मक राहतं. (How to Grow Cutting and Seeds) अनेकजण घरात जास्वंदाचे फुल लावतात. पण घरात फुलांची वाढ व्यवस्थित होत नाही फक्त पानांची वाढ होते अशी तक्रार अनेकजण करतात. जास्वंदाचे रोप लावताना काही सोप्या स्टेप्स फॉलो केल्या तर तुमचं काम अधिकच सोपं होईल आणि फुलझाडांची वाढ चांगली होईल. (How to Grow Hibiscus Plant at Home) तुळस, गुलाब, जास्वंद आणि मोगऱ्याची रोपं बाल्कनीत असायलाच हवीत. ज्यामुळे नेहमी प्रसन्न वाटतं. (Gardening Tips)
जास्वंदाचे रोप लावण्याची योग्य वेळ कोणती?
वर्षभरात कधीही तुम्ही जास्वंदाचे रोप लावू शकता. पण उन्हाळ्याच्या दिवसात जास्वंद लावणं फायदेशीर ठरतं. पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही जास्वंदाचे झाड लावू शकता. हे झाड लावण्यासाठी २ पद्धती फॉलो करू शकता. पहिलं म्हणजे बीया आणि दुसरं कटींग. परंतु कटिंगऐवजी तुम्ही मातीत बिया लावून रोपाची लागवड करू शकता.
जास्वंदाचे रोप तुम्हाला कोणत्याही नर्सरी सहज उपलब्ध होईल याऐवजी तुम्ही ऑनलाईन सुद्धा रोप विकत घेऊ शकता. (Hacks To Get More Hibiscus Flowers On Your Plant) जास्वंदाचे रोप वाढण्यासाठी ऊन खूप महत्वाचे असते. पण हे फुल झाड असल्यामुळे जास्त ऊन लागल्यामुळे चुकीचा परिणामही होऊ शकता. अशावेळी जास्वंद अशा ठिकाणी ठेवा जिथे चांगले ऊन पडत असेल.
डोक्यावर पांढरे केस जास्त चमकतात? किचनमधला हा पदार्थ वापरा-एकही केस पांढरा होणार नाही
जास्वंदाच्या झाडाला नियमित पाणी न दिल्यामुळे फुलं येणं कमी होऊ शकतं. अशा स्थितीत झाडाची देखभाल करण्यासाठी रोज झाडांना पाणी द्या. ३ ते ४ तास फुलझाडांना उन्हात ठेवा. जास्वंदाच्या झाडाला अनेकदा लवकर किड लागते, वेळोवेळी तुम्ही किटकनाशक शिंपडले नाही तर मुंग्या, किडे वाढू शकतात. केमिकल्सचा वापर करण्याऐवजी नैसर्गिक उपायांचा वापर करा. रोपाच्या ड्रेनेज सिस्टिमची सुद्धा काळजी घ्या.