जास्वंदाची फुलं सर्वांनाच आवडतात. पुजेपासून सौंदर्यांच्या उत्पादनापर्यंत अनेक कामांमध्ये जास्वंदाच्या फुलाचा वापर केला जातो. जास्वंदाला फुलं न आल्यानंतर पानं पिवळी पडू लागतात तर कधी झाडांची व्यवस्थित वाढतच होत नाही. (How to Grow Hibiscus Plant at Home) घरात अनेकजण हौशीने जास्वंदाचे रोप आणतात पण त्याची पानं पिवळी पडल्यामुळे किंवा फक्त पानच वाढताहेत, फुलांची वाढ होत नाही अशी तक्रार अनेकांची असते. (How To Grow Hibiscus Flowers At Home Indoors) जास्वंदाचे फुल व्यवस्थित फुलत नसेल किंवा पानं पिवळी पडत असतील तर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. ज्यामुळे जास्वंदाच्या फुलाला पोषण मिळेल. (Gardening Tips)
जास्वंदाचे रोपासाठी घरगुती खत कसे तयार करावे? (How to make fertilizer For Plants)
1) पाणी- 1 लिटर
२) एप्सम सॉल्ट- (१ चमचा)
३) एनपीके ००००५० - (१ चमचा)
4) कॉफी पावडर- १ चमचा
जास्वंदाला फुलं येण्यासाठी सोपा उपाय
1) एका मोठ्या मगमध्ये किंवा भांड्यात १ लिटर पाणी घ्या. त्यात चमचाभर एप्सम सॉल्ट घाला. त्यानंतर चमचा NPK 00 00 50 घालून व्यवस्थित मिसळा. आता एक पाकिट कॉफी पावडर त्यात मिसळा आणि व्यवस्थित मिश्रण बनवा. हे मिश्रण जास्वंदाच्या रोपांच्या मुळांमध्ये घाला. झाड जास्त मोठं असेल तर तुम्ही याचे प्रमाण वाढवू शकता.
सकाळी की संध्याकाळी कधी चालल्याने वजन लवकर कमी होतं? बारीक होण्यासाठी तज्ज्ञ सांगतात....
2) हे मिश्रण आठवड्यातून २ वेळा झाडांना लावा ३ ते ४ दिवसांच्या अंतराने पुन्हा झाडांना घाला. हे मिश्रण जास्वंदाच्या रोपाला पोषण देईल. यातून पोषक तत्व मिळतील. जास्वंदाच्या रोपाला ऊन आणि रात्रीच्या थंडीपासून वाचवणं गरजेचं आहे. खासकरून हिवाळ्याच्या दिवसांत अधिक काळजी घ्यावी लागते.
3) जास्वंद आपल्या क्षमतेनुसार पाणी शोषून घेतो. जर तुम्ही कमी पाणी घातलं तर फुलं येणार नाहीत आणि गरजेपेक्षा जास्त पाणी घालतं तर फुलं येणं बंद होईल. मातीत मॉईश्चर राहील या हिशोबाने पाणी घाला. पाण्याचे प्रमाण कमी जास्त झाल्यास याच्या फुलांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. जर माती ओली असेल तर तुम्ही त्यात पाणी नाही घातलं तरी चालेल.