जास्वंदाचे रोप आपल्या घरात असावे असं प्रत्येकालाच वाटतं. कारण फुलझाडांमुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण असते. याशिवाय मनही आनंदीत राहते. (Hibiscus Plant Care Tips) पण घरी असलेल्या फुलांच्या रोपांना फक्त पानंच जास्त प्रमाणात येतात किंवा पानं सुकतात, फुलांची व्यवस्थित वाढच होत नाही अशी अनेकांची तक्रार असते.(Gardening Tips)
फुलं कमी प्रमाणात येतात किंवा कळ्या व्यवस्थित खुलत नाहीत अशी अनेकांची तक्रार असते. काही सोप्या स्टेप्सचा आधार घेऊन तुम्ही काही महिन्यातच रोप फुलवू शकता. (How To Take Care Of Hibiscus Plant) हा उपाय केल्याने काही महिन्यातच जास्वंदाचे फुल चांगले वाढेल आणि बहरलेलं राहील आणि त्यात व्यवस्थित फ्लॉवरींग होईल. (Hibiscus Plant With Organic Fertilizer)
जास्वंदाचे रोप चांगले वाढण्यासाठी काय करावे? (How to Grow Hibiscus Plant At Home)
जास्वंदाचे रोप हे सन लविंग प्लांट (Sun Loving Plant) असते. त्यामुळे या रोपाला उन्हाची आवश्यकता असते. या रोपाला जितकं जास्त ऊन्हात ठेवाल तितकीच चांगली फुलं येतील. रोपाला जेव्हा जेव्हा पिवळी पानं येतील किंवा पानं पिवळी पडतील तेव्हा व्यवस्थित तोडून वेगळे करा. याशिवाय सुकलेल्या फांद्याही वेगळ्या ठेवा. रोपाच्या मुळाशी सर्कल असेल तर ते कापून वेगळे करा. रोपाच्या मुळाचा भाग चिरून वेगळा करा. ज्यामुळे हवा आणि ऊन दोन्ही येऊ शकेल.
1) कॉफी (Coffee)
हंकर.कॉमच्या रिपोर्टनुसार होममेड खतासाठी तुम्ही कॉफीचा वापर करू शकता. कॉफी ग्राऊंडमुळे रोपाला नायट्रोजन, पोटॅशिमम मिळते. कॉफी पावडरमध्ये मध्ये पाणी मिसळून या पाण्याचा मातीवर स्प्रे करा. ज्यामुळे रोपांची वाढ चांगली होईल.
2) इनो (Eno)
जास्वंदाच्या रोपाला किड लागू नये यासाठी तुम्ही इनोचा वापर करू शकता. सगळ्यात आधी पाणी घ्या त्यात १ पाकीट इनो घाला. हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित मिसळून काही वेळासाठी तसंच ठेवून द्या. इनोपासून तयार झालेलं लिक्विड स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि नंतर इतर रोपांवर स्प्रे करा. १ आठवडा या ट्रिकचा वापर केल्यास किड निघून जाण्यास मदत होईल.
3) केळ्याच्या सालीची पावडर (Banana Peel Powder)
सगळ्यात आधी तुम्हाला होममेड फर्टिलायजरचा वापर करावा लागेल. त्यासाठी केळ्याच्या सालीची पावडर हा उत्तम उपाय आहेत. केळ्याची सालं सुकवून त्याची पावडर बनवून घ्या नंतर मातीत मिसळा. यामुळे रोपाची वाढ चांगली होईल. केळ्याच्या सालीमुळे रोपाची वाढ भराभर होईल. यात फॉस्फरेस, नायट्रोजन आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे ग्रोथ चांगली होते. कळ्या आणि फुलंही चांगले येतात.
4) चहा पावडरचा वापर (Tea)
दुसरं होममेड फर्टिलायजर आहे चहा पावडर. चहा पावडर एक ग्लास पाण्यात मिसळून व्यवस्थित उकळून घ्या आणि थोडावेळासाठी तसंच सोडून द्या. २ तासांनी चहा पावडरचं पाणी रोपाच्या चारही बाजूंना घाला.