Join us  

बाल्कनीत कुंडीत लिंबाचं रोप लावलं तर ते जगतं का? रसदार लिंबू हवेत तर ‘अशी’ घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 1:48 PM

How To Grow Lemon Plant At Home (Can Lemon Grow in Pots) : लिंबाचं रोप कुंडीतही लावता येतं, पण काळजी कशी घ्यायची हे माहिती हवं.

लिंबू महाग झाले की अनेकदा वाटतं आपल्या घरात लिंबाचं झाड हवं होतं. ताजे रसदार लिंबू मिळाले असते. लिंबू तर स्वयंपाकात आवश्यकच (Gardening Tips). लिंबू सरबत कोणत्याही ऋतूत आवडीनं प्यायलं जातं. भाजी-कोशिंबिरीत लिंबू हवंच. पण सोपं आहे का आपल्या बाल्कनीत लिंबाचं झाड लावणं. लहानशा कुंडीत ते जगेल का आणि जगलं तरी फळ धरेल का? (How To Grow Lemon Plant At Home)

पॅच प्लांट्सच्या अहवालानुसार लिंबाचे झाड थोड्या मोठ्या आकाराच्या कुंडीत नक्की लावता येईल. मात्र रोपाला किमान ८ तास थेट सुर्यप्रकाश मिळेल अशी जागा कुंडीसाठी निवडा. लिंबाच्या रोपाला नियमित पाणी देणं आवश्यक आहे. एफिड्स किंवा मेलीबग्स यांसारख्या किटकांपासून संरक्षण करण्यासाठी लिंबाच्या रोपाची काळजी घ्यावी लागते. लिंबाला लवकर फळ लागेल असंही नाही, झाड मोठं होण्याची वाट पाहावी लागते. लिंबाचं रोपं घरीच सोप्या पद्धतीनं कसं लावायचं याच्या बेसिक टिप्स. (Garden Hacks For Lemon Tree)लिंबाचं रोप लावायचं कसं? ( Easy Ways To Grow Lemon Plant At Home)

लिंबाचं बी बाजारात मिळतं. घरी मोठं लिंबू असेल ते वाळलं, पिकलं तर त्यातल्या मोठ्या बिया वाळवून ठेवा त्या लावता येतात. ताज्या कोरफडीचे बारीक तुकडे करून त्यावर लिंबाची बी ठेवून ती मातीत पेरा. हळूहळू रोपं उगवताना दिसतील. लहान रोप मोठ्या कुंडीत शिफ्ट करणार असाल तर कुंडीत निम्मी माती घाला आणि ५० टक्के कोकोपीट आणि ५० टक्के वर्मीकंपोस्ट मिसळा. यात तुम्ही शेणखत मिसळू शकता. मग रोप लावा. हे लावल्यानंतर रोपाला पाणी द्या.

लिंबाच्या रोपाला थोडी मोठी कुंडी लागते. रोपाची काळजीही घ्यावी लागते. सूर्यप्रकाशात ठेवणे आणि नियमित पाणी हे केलं तर रोप चांगलं जगेल. लिंबाला फुलं लागली की जास्त काळजी घ्यायला हवी. लिंबू यायला वेळ लागू शकतो, त्यासाठी धीर धरावा. या पद्धतीनं सहज घरच्याघरी छोट्या जागेत लिंबाचं रोप लावता येईल.

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स