दसरा- दिवाळी अशा सणांना आपण आपलं घर छान सजवतो. सुंदर सजविलेल्या घराची शोभा आणखी वाढविण्याचं काम करतात ते झेडूंची फुलं.. त्यांचा रंग एवढा मोहक असतो की त्यांच्याकडे पाहूनच कसं मंगलमय, आनंदी वाटतं. त्यामुळे पुजेसाठी, घराला तोरण लावण्यासाठी, रांगोळीसाठी आणि इतर काहीसजावटीसाठी झेंडूची फुलं आपण आवर्जून घेतोच. सण साजरा झाला की देवाला वाहिलेली, घर सजविण्यासाठी वापरलेली झेंडूची फुलं आपण टाकून देतो. पण तसं मुळीच करू नका. कारण तुम्हाला तुमच्या अंगणात झेंडूचं रोप लावायचं असेल तर त्यासाठी या सुकलेल्या फुलांचा खूप चांगला वापर होऊ शकतो (how to grow marigold plant from leftover flowers?). म्हणूनच आता सुकलेल्या, टाकाऊ फुलांपासून रोप कसं तयार करायचं ते पाहूया...(gardening tips for marigold plant)
सुकलेल्या फुलांपासून झेंडूचं रोप कसं तयार करावं?
सगळ्यात आधी तर पुजेच्या इतर साहित्यातून किंवा सजावटीच्या इतर साहित्यातून झेंडूची फुलं वेगळी करा. त्यातली जी फुलं सडली आहेत, ती टाकून द्या. जी फुलं चांगली आहेत, पण फक्त सुकलेली वाटत आहेत, अशीच आपल्याला रोप तयार करण्यासाठी वापरायची आहेत.
अशी निवडून घेतलेली झेंडूची फुलं एखाद्या कागदावर किंवा ताटात पसरून ठेवा आणि थोडा वेळ उन्हात ठेवून चांगली वाळू द्या.फुलं चांगली वाळली की मग त्याच्या पाकळ्या अलगद वेगळ्या करून घ्या. पाकळ्यांचे खालचे टोक जिथे असते तिथे झेंडूची काळ्या- पांढऱ्या रंगाची बी असते. प्रत्येक फुलातून अशा बिया वेगळ्या करून घ्या.
त्यानंतर एका कुंडीमध्ये माती, कोकोपीट, शेणखत असं एकत्र करून माती थोडी भुसभुशीत करून घ्या. त्यामध्ये झेंडूच्या बिया टाका. बिया मातीमध्ये खूप खोल खाेचू नका. तसेच दोन बियांमध्ये २ ते ३ सेमी अंतर ठेवा.
तुमचं आणि तुमच्या मुलांचं नातं घट्ट असावं असं वाटतं ना? ४ गोष्टी करा- मुलं कधीच दुरावणार नाहीत
यानंतर या कुंडीमध्ये माती ओलसर राहील एवढं पाणी नियमितपणे टाका आणि कुंडी थोडी हवेशीर ठिकाणी उन्हामध्ये ठेवा. काही दिवसांतच छान रोप उगवेल. झेंडूच्या रोपाची खूप काळजी घेण्याची गरज नसते. अगदी सहज ते रोप खूप जोमाने वाढतं.