Join us  

कुंडीमध्ये मेथीची भाजी लावणं अगदी सोपं- फक्त १ काम करा आणि दररोज घरची फ्रेश मेथी खा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2023 11:18 AM

Gardening Tips For Growing Methi in Home Garden: घरच्या बागेत पालेभाज्या लावायच्या असतील तर हिवाळा हा अगदी उत्तम ऋतू आहे. त्यातल्या त्यात मेथी लावणं तर अगदी सोपं. म्हणूनच पाहा कुंडीमध्ये मेथी कशी लावायची....(just 1 step to grow fenugreek in your garden)

ठळक मुद्देआता आपण ज्या पद्धतीने मेथी कुंडीत लावणार आहोत, त्यानुसार अगदी २० ते २५ दिवसांत तुम्हाला घरची ताजी- हिरवीगार मेथी खायला मिळू शकते.

आपल्याला माहितीच आहे की हिवाळ्यात पालेभाज्या भरपूर प्रमाणात मिळतात. कारण हा ऋतू पालेभाज्यांच्या वाढीसाठी उत्तम असतो. म्हणूनच या दिवसांत आपण अगदी सहजपणे आपल्या बागेतही पालेभाज्या लावू शकतो. त्यातही इतर पालेभाज्यांपेक्षा मेथीची भाजी कुंडीमध्ये लावणं तर अगदीच सोपं आहे. यासाठी खूप मोठी कुंडी असण्याचीही गरज नाही. फक्त कुंडीचा आकार थोडा पसरट किंवा आयाताकृती- चौकोनी असावा (Simplest way for growing methi in home garden). आता आपण ज्या पद्धतीने मेथी कुंडीत लावणार आहोत, त्यानुसार अगदी २० ते २५ दिवसांत तुम्हाला घरची ताजी- हिरवीगार मेथी खायला मिळू शकते. (How to grow methi or fenugreek in home garden)

 

कुंडीमध्ये मेथीची भाजी कशी लावायची?

कुंडीमध्ये मेथीची भाजी कशी लावायची आणि तिची कशी काळजी घ्यायची याविषयीचा व्हिडिओ plantaholic_journey या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

ठेवणीतल्या ब्लँकेट्स- चादरींना कुबट वास येतो? ३ उपाय करा- न धुता पांघरुणं होतील स्वच्छ- सुगंधी

यासाठी आपल्याला घरात असणारे मेथी दाणे लागणार आहेत.

सगळ्यात आधी तर एक पसरट आकाराची कुंडी घ्या.

हिवाळ्यासाठी फॅशनेबल श्रग घ्यायचाय? ऑनलाईन खरेदीवर सध्या मिळतोय भरपूर डिस्काउंट- पाहा पर्याय

त्या कुंडीतल्या मातीमध्ये एक ते दिड इंचाचे खाेल वाफे करा. दोन वाफ्यांमधलं अंतरही साधारण तेवढंच असावं.

त्यानंतर एका वाटीमध्ये मेथीदाणे घ्या आणि ते रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.

 

दुसऱ्यादिवशी सकाळी वाटीतलं पाणी काढून टाका आणि रात्रभर पाण्यात भिजलेले मेथी दाणे कुंडीत तयार केलेल्या वाफ्यांमध्ये थोडे थोडे करून टाका. 

यानंतर त्या वाफ्यांवरून पुन्हा एकदा मातीचा थर पसरवून टाका. त्याला थोडं पाणी घाला.

थंडीमुळे हाताचे कोपरे कोरडे पडून जास्तच काळवंडले? ३ उपाय करा- टॅनिंग निघून कोपरे होतील स्वच्छ

ही कुंडी तुमच्या बागेत अशा ठिकाणी ठेवा की जिथे तिला ४ ते ५ तास चांगलं ऊन मिळेल. अगदी २ ते ३ दिवसांतच छोटी छोटी पानं उगवलेली दिसतील.

मेथीच्या भाजीची पुर्णपणे वाढ होण्यासाठी २० ते २५ दिवसांचा वेळ लागतो. त्यानंतर मेथीची पानं कापून घ्या. मेथी मुळापासून उपटू नका. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सगच्चीतली बागइनडोअर प्लाण्ट्स