'पुदिना' ही अतिशय औषधी आणि वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी वापरली जाणारी खास वनस्पती आहे. आजारपणात औषध म्हणून आणि किचनमध्ये चटणीपासून बिर्याणीपर्यंत अनेक पदार्थ तयार करण्यासाठी पुदिन्याच्या (How to Grow Mint at Home Fast & Easy) हिरव्यागार पानांचा वापर केला जातो. असा हा बहुगुणी ( Very Fast & Simple Method to Grow Mint At Home) आणि बहुउपयोगी पुदिना आपण शक्यतो नेहमीच्या वापरात वापरतोच. पुदिना प्रकृतीने थंड, पित्तनाशक समजला जातो. पुदिन्याचे याशिवायही अनेक औषधी व आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. भाजी, वरण, चटणी या कोणत्याही प्रकारात जर पुदिन्याचा थोडासा स्वाद असला तरी त्या पदार्थाची चव आणि सुवास लगेच खुलतो म्हणूनच बऱ्याच जणांना वेगवेगळ्या रेसिपींमध्ये पुदिना घालायला आवडतं(How To Grow Mint Plant At Home).
पुदिन्याची जुडी बाजारात विकत घ्यायला गेलं तर १० ते १५ रुपयांत मिळते. बऱ्याचदा ती आपल्याकडून नीट निवडणं होत नाही. त्यामुळे मग तो बराचसा वाया जातो. काहीवेळा तर पुदिना न निवडता तसाच फ्रिजमध्ये ठेवल्याने ही पुदिन्याची जुडी कुजून खराब होते. अशावेळी पुदिना कधीही चटकन वापरायला अगदी हाताशी असला पाहिजे असं कित्येक गृहिणींना वाटत. यासाठीच आता बाजारातून नेहमीच पुदिना विकत आणण्यापेक्षा तुमच्याकडच्या एखाद्या छोट्याशा रिकाम्या कुंडीमध्येदेखील आपण पुदिन्याचे छोटंसं रोपटं लावू शकता. कुंडीमध्ये पुदिना कसा लावायचा आणि त्याची कशी काळजी घ्यायची ते पाहा.
घरच्या गार्डनमधील कुंडीत पुदिना कसा लावायचा ?
घरच्या गार्डनमधील कुंडीत पुदिन्याच रोपं कसं लावावं याची सविस्तर माहिती glitters.of.nature या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. पुदिना लावण्यासाठी एखादी मध्यम आकाराची पसरट कुंडी घ्या. यानंतर पुदिन्याच्या ४- ५ काड्या घ्या. या काड्यांच्या किंवा देठांच्या खालच्या भागातली पानं काढून टाका. वरची पानं तशीच राहू द्या. त्यानंतर या पुदिन्याच्या काड्यांच्या खालच्या देठाकडील भागावर थोडे वर कात्रीच्या मदतीने हलकासा तिरका छेद देत देठाला लहानसा कट द्यावा.
आता एक अर्धा ग्लास भरून पाणी घ्या. त्या पाण्यात पुदिन्याची देठं बुडवून ठेवा. साधारण ६ ते ७ दिवसांनंतर त्या देठांना मुळं आलेली दिसतील.
त्यानंतर ती देठं ग्लासमधून काढा आणि कुंडीतल्या मातीत थोड्या थोड्या अंतराने लावून टाका. काही दिवसांतच कुंडीतला पुदिना छान बहरून येईल.
कुंडीतील रोपांसाठी शेणखत वापरण्याची योग्य पद्धत, रोपं फळाफुलांनी येतील बहरून...
कुंडीतील मातीत मिसळा मूठभर गूळ, रोपांची वाढ होईल दुप्पट वेगाने- फळाफुलांचा येईल बहर...
माती ओलसर राहील एवढंच पाणी त्याला द्या. खूप जास्त पाणी घालू नका.
पुदिना कुंडीत लावल्यानंतर ती कुंडी १० ते १५ दिवस तरी प्रखर उन्हात ठेवू नका. कारण सध्याच्या खूप तिव्र उन्हामुळे तो लगेचच कोमेजून जाऊ शकतो.