मोगऱ्याचा सुंगध खास असतो कोणताही सण असेल किंवा कार्यक्रम मोगऱ्याच्या फुलांना खूपच डिमांड असते. मोगऱ्याच्या सुगंधामुळे घराचे वातावरणही चांगले राहते. (Gardening Hacks) मोगऱ्याचे फुल लावताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. ज्यामुळे भरपूर फुलं येतील. सोप्या गार्डनिंग टिप्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. ज्यामुळे फुलांची वाढ चांगली होईल आणि तुमचे घरही बहरलेलं राहील. (Gardening Tips)
मोगऱ्याचे रोप कधीच प्लास्टीकच्या कुंडीत लावू नये. कारण मोगऱ्याचे रोप प्लास्टीकच्या कुंडीत व्यवस्थित फुलत नाही. मोगरा प्लास्टीकच्या कुंडीत असेल तर जास्त गरमीच्या वातावरणामुळे रोपाचे नुकसान देखिल होऊ शकते. (How To Get More Flowers In Mogra Plant) मोगऱ्याचे रोप ऊन्हात लावण गरजेचं आहे. फक्त अर्धा तासासाठी मोगऱ्याचे रोप ऊन्हात ठेवून काम होणार नाही. कमीत कमी 5 ते 6 तास मोगऱ्याचे रोप ऊन्हात ठेवावे लागेल. ज्यामुळे जास्तीत जास्त फुलं येतील.
मोगऱ्याच्या रोपाच्या पोषणाासाठी भरपूर खत घालणं गरजेचं असतं. मातीत 50 टक्के गाईचे शेण घाला. महिन्यातून एकदा माती बदला. यात 15 टक्के रेतीसुद्धा मिसळू शकता. मोगऱ्यात एप्सम सॉल्ट मिसळल्याने मोगऱ्याला पोषण मिळते. कमीत कमी 2 लिटर पाण्यात 1 चमचा एप्सम सॉल्ट मिसळ हे मिश्रण मोगऱ्याच्या रोपावर स्प्रे करा. नंतर मोगऱ्याला फुलंच फुलं आलेली दिसतील. मोगरा जास्तवेळ ऊन्हात राहिल्यामुळे लवकर सुकू शकतो. म्हणून यात भरपूर प्रमाणात पाणी घाला. रोज योग्य प्रमाणात पाणी घातल्याने मोगऱ्याची वाढ चांगली होईल.
मोगऱ्यासाठी घरगुती फर्टिलायजर कसे तयार करावे?
कांद्याची साले दोन-तीन दिवस पाण्यात भिजत ठेवा आणि नंतर ते पाणी गाळून मोगरा रोपात टाका. आपण ते दर दोन आठवड्यांनी वापरू शकता. केळीच्या सालीमध्ये भरपूर पोटॅशियम असते आणि त्यामुळे ते मातीत मिसळून वापरता येते. केळीची साले वाळवून नंतर बारीक करून पावडर मातीत मिसळा. माती खणून देखील ते जोडले जाऊ शकते जेणेकरून खत मुळांपर्यंत पोहोचेल.