Lokmat Sakhi >Gardening > मनी प्लांट सुकतो-वेल वाढतच नाही? १ पांढरी वस्तू घाला; भराभर वाढेल प्लांट, वेलींनी सजेल घर

मनी प्लांट सुकतो-वेल वाढतच नाही? १ पांढरी वस्तू घाला; भराभर वाढेल प्लांट, वेलींनी सजेल घर

How to Grow Money Plant At Home : मनी प्लांट व्हेंटिलेशन असलेल्या ठिकाणी ठेवा, जिथे जास्त ऊन येणार नाही अशी व्यवस्था पाहा.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 01:41 PM2024-01-17T13:41:52+5:302024-01-17T15:51:53+5:30

How to Grow Money Plant At Home : मनी प्लांट व्हेंटिलेशन असलेल्या ठिकाणी ठेवा, जिथे जास्त ऊन येणार नाही अशी व्यवस्था पाहा.

How to Grow Money Plant At Home : Mix these White Ingredient in Money Plant For Better Growth  | मनी प्लांट सुकतो-वेल वाढतच नाही? १ पांढरी वस्तू घाला; भराभर वाढेल प्लांट, वेलींनी सजेल घर

मनी प्लांट सुकतो-वेल वाढतच नाही? १ पांढरी वस्तू घाला; भराभर वाढेल प्लांट, वेलींनी सजेल घर

मनी प्लांट दिसायला सुंदर तितकंच मनालाही आनंद देणारे असते. मनी प्लांट लावल्याने घराची शोभा वाढते आणि हवा देखिल ताजी, शुद्ध राहते घरात मनी प्लांट लावण्याच्या विचारात असाल तर  काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. मनी प्लांटची पानं सुकतात, वाढ व्यवस्थित होत नाही अशी अनेकांची तक्रार अससते. (How to Grow Money Plant Faster At Home)

मनी प्लांटची ग्रोथ व्यवस्थित होण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. (Gardening Tips in Marathi) मनी प्लांट लावताना २ किंवा ३ नॉड्स असलेल्या कटींगचा वापर करा. याचा खालचा भाग बॉटलमध्ये असावा. यात जराही खारं पाणी असू नये. फिल्टरचं पाणीसुद्धा तुम्ही युज करू  शकता. व्हेंटिलेशन असलेल्या ठिकाणी ठेवा, जिथे जास्त ऊन येणार नाही अशी ही व्यवस्था पाहा. (Secret to Grow Money Plant)

मातीत मनी प्लांट लावताना काय काळजी घ्यावी. (Secret To Grow Money Plant Amazing)

मातीत कोकोपीट मिसळून खत तयार करा. त्यात पानांचा भाग मातीच्या वर असायला हवा. मातीत मॉईश्चर टिकून राहण्यासाठी त्यात रोज पाणी घालत राहा. प्रूनिंग केल्याने झाडांची वाढ चांगली होते. तुम्ही सुकलेली पानं प्रूनरच्या मदतीने काढून घ्या. प्लांटचा नॉडवाला भाग कापू नका. अन्यथा पानांची व्यवस्थित वाढ होणार नाही. 

गुलाब नुसताच वाढतो फुलं येत नाहीत? मातीत १ पदार्थ मिसळा- नर्सरीवाल्याचं खास सिक्रेट

पाणी बदलत राहा

जर तुम्ही पाण्यात मनी प्लांट लावला असेल तर असेल तर यातलं पाणी आठवड्यातून २ ते ३ वेळा बदलत राहा. मातीत मनी प्लांट लावले असेल तर महिन्यातून एका त्यात शेण मिसळून ऑर्गेनिक खत घाला. मनी प्लांटची ग्रोथ वेगाने होण्यसाठी यात केमिकल्सयुक्त फर्टिलायजर्सचा उपयोग करू नका.

मनी प्लांटमध्ये ही पांढरी वस्तू घाला (Secret Ingredient To Grow Money Plant)

मनी प्लांटमध्ये दूध घातल्याने रोपाला कॅल्शियम मिळते. पण मनी प्लांटमध्ये जास्त प्रमाणत दूध घालू नका. एक ग्लास पाण्यात पाव ग्लास गाईचे किंवा म्हशीचे दूध मिसळून हे पाणी एकजीव करा आणि स्प्रे बॉटलमध्ये भरा. स्प्रे बॉटलमध्ये भरलेलं पाणी मनी प्लांटमध्ये आठ्ड्यातून एकदा घाला. या उपायाने झाड हिरवंगार होईल आणि पानांची वाढ भराभर होईल. 

गुलाबाला फुल येत नाही-पानंच वाढतात? 5 रूपयांचा हा पदार्थ मिसळा, १५ दिवसांत फुलंच फुलं येतील

मनी प्लांटच्या वाढीसाठी काय घालावे?

मनी प्लांटच्या ग्रोथसाठी मातीत हळद किंवा एप्सम सॉल्ट घालणं गरजेचं आहे. यामुळे मनी प्लांटमध्ये फंगस लागत नाही. यातून तुम्हाला पोषक तत्व मिळतील आणि वेल लांबच लांब होईल. मनी प्लांट ना मुंग्या किडे लागू नये यासाठीही हा उपाय फायदेशीर आहे.

Web Title: How to Grow Money Plant At Home : Mix these White Ingredient in Money Plant For Better Growth 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.