Join us  

घरातला मनी प्लांट नीट वाढतच नाही? 3 टिप्स, ढेरेदार होईल घरातलं मनी प्लांट-वाढेल भराभर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 12:26 PM

How To Grow Money Plant Faster : मनी प्लांट थेट उन्हाच्या संपर्कात येणार नाही असे पाहा. मनी प्लांटची पानं जळण्याचा धोका असतो

मनी प्लांट (Money Plant) घरात लावणं सकारात्मक उर्जेचं स्त्रोत मानले जाते.  मनी प्लांट लावणं शुभ  मानलं जातं. आपल्या घरात सुख, समृद्धी यावी यासाठी लोक मनी प्लांट लावतात. (How To Grow A Money Plant At Home) भरपूर काळजी घेतल्यानंतरही मनी प्लांट ढेरेदार होत नाही मनी प्लांटची हवीतशी वाढ होत नाही, अशी तक्रार असते अनेकांची. मनी प्लांट वाढण्यासाठी काय करावे याच्या सोप्या टिप्स पाहूया. (Grow money plant from single leaf)

मनी प्लांट तुम्ही कुठेही लावू शकता. माती किंवा पाण्यात  दोन्ही गोष्टी मनीप्लांटसाठी योग्य आहेत. जर या झाडाला नवीन मुळं येत नसतील तर तुम्ही मातीचा आधार घेऊ शकता. मनी प्लांटची पानं न विसरता ट्रिम करा त्यानंतर फांदी तोडून पॉटमध्ये ठेवा.  सुरूवातीपासून रसायनांचा वापर करू नका अन्य़था पानं खराब होऊ शकतात. (How To Grow And Care For A Money Plant)

घरातील मनी प्लांटची अशी घ्या काळजी

मनी प्लांट पाण्यात ठेवला असेल तर मनी प्लांटचे पाणी वेळोवेळी बदलत राहा. पाणी बदलताना त्यात एस्प्रीनची एक गोली घाला. मनी प्लांटमधलं पाणी १५ ते २० दिवसांनी बदलत राहा, मनी प्लांटची नॉड पाण्यातच्या आत राहील असे पाहा अन्यथा ग्रोथ व्यवस्थित होणार नाही. 

दिवसरात्र खाज येते, केसात उवा-लिखा असण्याची भिती वाटते? सोपा उपाय, उवा गायब होतील

मनी प्लांट थेट उन्हाच्या संपर्कात येणार नाही असे पाहा. चांगल्या वाढीसाठी त्यात एप्सम सॉल्ट घाला. मनी प्लांटमध्ये रोज पाणी घालू नका. असं केल्याने वाढ चांगली होईल. त्यात जास्त फर्टिलायजर्स घालू नका. अन्यथा मनी प्लांट खराब होऊ सकतो आणि पानंही खराब होऊ शकतात. 

मनी प्लांट थेट उन्हाच्या संपर्कात येणार नाही असे पाहा. मनी प्लांटची पानं जळण्याचा धोका असतो.  मनी प्लांटला कोणत्याही रसायनांची आवश्यकता नसते तुम्ही यात थोडं एप्सम सॉल्ट घालू शकता. ज्यामुळे वाढ चांगली होईल. तुमचे मनी प्लांट डबल कलरचे असेल तर त्याला जास्त सुर्यप्रकाशाची आवश्यकता असते. 

चमचाभर दह्याने घरी करा फेशियल, ५०० ते हजार रूपये वाचतील-पार्लरशिवाय चेहरा दिसेल ग्लोईंग

मनी प्लांटला मॉईश्चराईज मातीची आवश्यकता असते. म्हणून रोज पाणी देत राहा. मातीत तुम्ही कम्पोस्ट किंवा कोको पीट मिसळू शकता. तीन महिन्यातून एकदा नायट्रोजन रिच फर्टिलायजर घाला. हेवी फर्टिलायजर घालू नका अन्यथा पानं जळू शकतात.

टॅग्स :बागकाम टिप्स