Join us  

घरातल्या मनी प्लांटची वाढच होत नाही ५ गोष्टी करा, भराभर वाढेल - वेलींनी बहरेल घर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 1:51 PM

How To Grow Money Plant : जर वातावरणात गारवा असेल तर पाणी ३ ते ४ दिवसांनी बदलू शकता.

घरात मनी प्लांट (Money Plant) असेल तर घरातलं वातावरण चांगले राहते. याशिवाय घरात चांगली हवा येते. मनी प्लांटची पानं  सुकतात, पानांची व्यवस्थित वाढ होत नाही असा प्रोब्लेम बऱ्याचजणांना येतो. खूप कमी जणांच्याघरी मनी प्लांट चांगला वाढतो. काही लोक मनी प्लांट काचेच्या बाटलीत लावतात आणि १ ते २ दिवसांनी पाणी बदलत राहतात.  (How To Grow Money Plant At Home Naturally)

जर वातावरणात गारवा असेल तर पाणी ३ ते ४ दिवसांनी बदलू शकता. (Complete Guide To Grow Money Plant) नियमित पाणी बदलल्याने मनी प्लांटमध्ये  किडे लागणार नाहीत. मनी प्लांटची पानं सुकली असतील तर ती आधी कापून घ्या. (How To Grow Money Plant At Home Naturally)

मनी प्लांट मातीत कुंडीत लावला असेल तर मातीसुदधा बदलत राहा. मातीत चांगल्या गुणवत्तेचं खत घाला. चांगल्या वाढीसाठी तुम्ही मनी प्लांटचं प्रूनिंग करू शकता.  याव्यतिरिक्त मनी प्लांट ऊन्हात ठेवू नका. मनी प्लांटवर किटकनाशकं फवारू नका. या दरम्यान पानं चांगली राहतील याची काळजी घ्या. (How To Grow Money Plant)

मनीप्लांट लावण्यासाठी २ किंवा ३ नोड्सवाली कटींग घ्या, खालचा भाग बुडेल इतकं पाणी बाटलीत भरा, हे पाणी खारट असू नये, फिल्टरचं पाणी तुम्ही वापरू शकता. व्हेंटिलेशन असलेल्या जागेवर ठेवा, थेट ऊन्हाच्या संपर्कात ठेवू नका.

३० दिवसांत वजन कमी करण्याचा डॉक्टर सांगतात खास हेल्दी उपाय, पोटही होईल कमी

मनी प्लांटच्या वाढीसाठी कुंडीतल्या मातीत एप्सम सॉल्ट मिसळा, एप्सम सॉल्ट प्रभावी ठरते.  ज्यामुळे मनी प्लाटंवर बुरशी येत नाही वेगाने वाढते आणि पानांचीही वाढ होते आणि पानांना बुरशी येत नाही. पोषक तत्व मिळाल्याने पान लांब होतात.

मनी प्लांट लावल्यानंतर २-३ पाणी बदलत राहा. मनी प्लांट लावल्यानंतर माती महिन्यातून एकदा बदलत राहा. शेणखत पाण्यात मिसळून घाला.  ज्यामुळे मनी प्लांटची वेगाने वाढ होईल. यात केमिकल फर्टिलायजरचा वापर करू नका. प्रूनिंग केल्याने रोप वेगाने वाढते. जेव्हा पानं सुकतात तेव्हा सुकलेली पानं प्रूनरच्या मदतीने काढून वेगळे करा.

शरीराला आतून पोखरते व्हिटामीन B-१२ ची कमी; ५ लक्षणं ओळखा-खा ५ पदार्थ, भरपूर व्हिटामीन मिळेल

प्लांटचा नॉड्सवाला भाग कापू नका कारण ज्यामुळे त्यात पानं येणार नाहीत. कुंडीत मातीबरोबर कोकोपीट मिसळून खत तयार करा. आता कटिंग यात लावून घ्या त्यात मातीचा भाग वर असायला हवा. फक्त माती ओली नसल्यास त्यात रोज पाणी घालत राहा. अशा ठिकाणी ठेवा जिथे जास्त ऊन येईल.

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स