जेवणात कांदा असेल तर पदार्थाची चव आणखीनच वाढत जाते. एखाद्या अळणी पदार्थासोबत साधा कच्चा कांदा जरी तोंडी लावला तरी त्या पदार्थाची चव खुलते. म्हणूनच बहुतांश घरांमध्ये वर्षभर हमखास कांदा असतोच. म्हणूनच आता कांदा विकत घेण्याऐवजी तो तुमच्या बाल्कनीतल्या किंवा अंगणातल्या एखाद्या कुंडीत लावा आणि घरच्या कांद्याचा स्वाद कसा निराळाच असतो, ते चाखून पाहा. आपल्याला माहितीच आहे की हिवाळा हा अनेक भाज्यांच्या वाढीसाठी खूपच उत्तम हंगाम आहे. त्यामुळे या दिवसांत कुंडीत वेगवेगळ्या भाज्या लावण्याचा प्रयोग करून पाहिला तर तो हमखास यशस्वी होतोच. म्हणूनच आता तुमच्या घरात कुंडीमध्ये कांदा लावण्याचा हा सोपा प्रयोग एकदा करून पाहा (Gardening Tips For Growing Onion). अगदी काही महिन्यांतच तुम्हाला घरचे कांदे खायला मिळतील.(how to grow onion in your kitchen window or terrace garden?)
कुंडीमध्ये कांदा कसा लावावा?
१. जर तुम्हाला कुंडीमध्ये कांदा लावायचा असेल तर कुंडी घेताना ती थोडी पसरट आकाराची घ्या. कारण कांद्याच्या वाढीसाठी खोल कुंडीपेक्षा पसरट कुंडी अधिक उपयुक्त ठरते. कांदा तुम्ही दोन पद्धतींनी लावू शकता.
कॉटन साडीवर घालायला कलमकारी ब्लाऊज शिवायचं? बघा ८ सुंदर पॅटर्न्स- दिसाल एकदम स्टायलिश
एक म्हणजे नर्सरीमध्ये किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवर कांद्याचं बी मिळतं. ते आणूना तुम्ही कांदा लावू शकता किंवा मग कांद्याची पात वापरूनही कांदा लावता येतो.
२. कांद्यासाठी आपल्याला मिश्र स्वरुपाची माती वापरायची आहे. त्यामुळे ५० ते ६० टक्के माती, ३० ते ४० टक्के गांडूळ खत आणि १० ते २० टक्के कोकोपीट अशा पद्धतीने कुंडी भरा.
३. आता जेव्हा कांद्याची पात घेऊन तुम्ही कांदा लावणार असाल तेव्हा पातीच्या कांद्याला जी मुळं असतात, त्यासकट कांदा मातीमध्ये खाेचा. खूप जोर देऊन तसेच खूप खोलवर कांदा खोचू नका. अशा पद्धतीने कुंडीत ठराविक अंतराने ७ ते ८ कांदे खोचून ठेवा.
चेहऱ्यावर बारीक खड्डे दिसतात- पिंपल्सही खूप वाढले? 'हा' घरगुती उपाय करा- चेहरा होईल स्वच्छ
४. सुरुवातीला ही कुंडी अशा ठिकाणी ठेवावी जिथे तिला ५ ते ६ तास चांगला सुर्यप्रकाश मिळेल. शिवाय कुंडीतली माती कायम ओलसर राहिल याची काळजी घ्यावी. त्यामुळे रोज सकाळी किंवा संध्याकाळी नेमाने पाणी घाला. कांदा व्यवस्थित उगवायला साधारण ३ ते ४ महिन्यांचा वेळ लागतो.