Lokmat Sakhi >Gardening > घरात लहानशा कुंडीतच लावा प्राजक्ताचं रोप; सोपी ट्रिक, सुगंधित फुलांचा पडेल सडा-बहरेल घर

घरात लहानशा कुंडीतच लावा प्राजक्ताचं रोप; सोपी ट्रिक, सुगंधित फुलांचा पडेल सडा-बहरेल घर

How To Grow Parijat At Home : फळांच्या साली प्राजक्ताच्या रोपाच्या कुंडीत घाला. त्यानंतर उरलेली चहा पावडरसुद्धा कुंडीत घालू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 06:26 PM2024-09-26T18:26:58+5:302024-09-26T18:51:38+5:30

How To Grow Parijat At Home : फळांच्या साली प्राजक्ताच्या रोपाच्या कुंडीत घाला. त्यानंतर उरलेली चहा पावडरसुद्धा कुंडीत घालू शकता.

How To Grow Parijat At Home : How To Grow Parijat At Home Gardening Tips | घरात लहानशा कुंडीतच लावा प्राजक्ताचं रोप; सोपी ट्रिक, सुगंधित फुलांचा पडेल सडा-बहरेल घर

घरात लहानशा कुंडीतच लावा प्राजक्ताचं रोप; सोपी ट्रिक, सुगंधित फुलांचा पडेल सडा-बहरेल घर

सुगंधित, सुंदर प्राजक्ताच्या फुलांना पाहून मन आनंदून जाते. छोट्या रोपांमध्येही प्राजक्त लावले जाते.  अनेकदा औषधांमध्ये याचा वापर केला जातो.  प्राजक्ताची फुलं घरात लावण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता.  जर तुम्ही घरी प्राजक्ताचं रोप लावू इच्छित असाल तर काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही घराच्या अंगणात हे रोप लावू सकता. (How To Grow Parijat At Home Gardening Tips)

यामुळे शरीराला अनेक आरोग्यदायी फायदेसुद्धा मिळतील. असा अनेकांचा समज असतो की प्राजक्ताच्या रोपाला भरपूर जागा लागते पण असं अजिबात नाही. काही सोप्या स्टेप्स आणि टिप्स फॉलो करून तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीनं प्राजक्ताचे रोप लावू शकता. 

प्राजक्ताचे रोप कुंडीत लावण्यासाठी मातीच्या कुंडीचा व्यास  १६ इंच इतका असावा. कुडींच्या तळव्याला ३ छिद्र असावेत कारण यामुळे अतिरिक्त पाणी निघण्यास मदत होते.  स्प्रिंग सिजनमध्ये बीया किंवा कापलेले तण तुम्ही यात घालू शकता. हिवाळ्याच्या वातावरणात प्राजक्ताचे रोप लावू नका. पोटींग मिक्समध्ये ५० टक्के सामान्य गार्डनची माती आणि ५० टक्के कोणतंही ऑर्गेनिक खाद्य जसं की वर्मी कंपोस्ट असायला हवं.  व्यवस्थित मिसळून ट्रे भरून ठेवा. प्रत्येक सेक्शनमध्ये एक बी असायला हवी २ सेमीचे खोल असायला हवं.  रोपांचे मॉईश्चर टिकून राहण्यासाठी अधिक पाणी घालू नका. 

पोट लटकलं, मांड्या थुलथुलीत दिसतात? वापरा 5:2 चा वेट लॉस फॉर्म्यूला, वाढलेलं वजन चटकन उतरेल

प्राजक्ताच्या रोपाची काळजी कशी घ्यावी

प्राजक्ताच्या रोपाला  ६ तासांच्या सुर्य प्रकाशाची  आवश्यकता असते. तापमान खूप जास्त असू नये. कधी त्यात पाणी जमा होऊ देऊ नका कारण यामुळे रोपाचे नुकसान होऊ शकते. यातून पाणी काढण्याची व्यवस्था असेल याची खात्री करा. जेव्हा वरवरची तमीत सुकू लागेल तेव्हा एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी पाणी द्यायला हवं.


 

प्राजक्ताच्या रोपासाठी नैसर्गिक खत कसे बनवावे?

प्राजक्ताच्या रोपासाठी खत बनवण्यासाठी ४० ते ५० टक्के शेतातली माती लागते.. ३० टक्के शेणखत, २० टक्के रेती किंवा कोकोपीट लागेल. एका भांड्यात व्यवस्थित मिसळल्यानंतर एक कप पाणी घाला आणि नंतर पुन्हा मिक्स करा. नंतर सावली असलेल्या ठिकाणी ठेवा. दुसऱ्या दिवशी तुम्ही प्राजक्ताच्या  रोपाच्या मातीत हे मिक्स करू शकता. या रोपाला काही दिवसातंच फुलं लागलेली दिसून येतील.

फळांच्या सालीचे खत

फळांच्या साली प्राजक्ताच्या रोपाच्या कुंडीत घाला. त्यानंतर  उरलेली चहा पावडरसुद्धा कुंडीत घालू शकता. यानंतर मातीत चुटकीभर मीठ घाला नंतर एका भांड्यानं झाकून  १ आठवड्यासाठी तसंच सोडून द्या. एक आठवड्यानंतर खत तयार असेल या मातीचा वापर करून तुम्ही प्राजक्ताचं रोप लावू शकता. हे खाद्य कंटेनरमध्ये बनवून मातीसोबत मिक्स करा.

Web Title: How To Grow Parijat At Home : How To Grow Parijat At Home Gardening Tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.