Join us

कुंडीतही लावता येईल प्राजक्ताचं रोपं- पाहा ‘ही’ युक्ती- सुगंधी फुलांचा पडेल सडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 17:59 IST

How To Grow Parijat At Home : फळांच्या साली प्राजक्ताच्या रोपाच्या कुंडीत घाला. त्यानंतर उरलेली चहा पावडरसुद्धा कुंडीत घालू शकता.

सुगंधित, सुंदर प्राजक्ताच्या फुलांना पाहून मन आनंदून जाते. अनेकदा औषधांमध्ये याचा वापर केला जातो. जर तुम्ही घरी प्राजक्ताचं रोप लावू इच्छित असाल तर काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही घराच्या अंगणात हे रोप लावू सकता. (How To Grow Parijat At Home Gardening Tips)

यामुळे शरीराला अनेक आरोग्यदायी फायदेसुद्धा मिळतील. असा अनेकांचा समज असतो की प्राजक्ताच्या रोपाला भरपूर जागा लागते पण असं अजिबात नाही. काही सोप्या स्टेप्स आणि टिप्स फॉलो करून तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीनं प्राजक्ताचे रोप लावू शकता. 

प्राजक्ताचे रोप कुंडीत लावण्यासाठी मातीच्या कुंडीचा व्यास  १६ इंच इतका असावा. कुडींच्या तळव्याला ३ छिद्र असावेत कारण यामुळे अतिरिक्त पाणी निघण्यास मदत होते.   हिवाळ्यात प्राजक्ताचे रोप लावू नका. कुंडी भरताना ५० टक्के माती आणि ५० टक्के कोणतंही ऑर्गेनिक खाद्य जसं की वर्मी कंपोस्ट असायला हवं. व्यवस्थित कुंडी भरा. खूप पाणी घालून चिखल करु नका. माती मोकळी मोकळीच रहायला हवी. तुम्ही प्राजक्ताचं रोप नर्सरीतून आणून लावलं तर रोपाच्या मातीसह लावा. जास्त पाणी घालू नका.

पोट लटकलं, मांड्या थुलथुलीत दिसतात? वापरा 5:2 चा वेट लॉस फॉर्म्यूला, वाढलेलं वजन चटकन उतरेल

प्राजक्ताच्या रोपाची काळजी कशी घ्यावी

प्राजक्ताच्या रोपाला  ६ तासांच्या सुर्य प्रकाशाची  आवश्यकता असते. तापमान खूप जास्त असू नये. कुंडीत पाणी जमा होऊ देऊ नका कारण यामुळे रोपाचे नुकसान होऊ शकते. यातून पाणी काढण्याची व्यवस्था असेल याची खात्री करा.

 

प्राजक्ताच्या रोपासाठी नैसर्गिक खत कसे बनवावे?

प्राजक्ताच्या रोपासाठी खत बनवण्यासाठी ४० ते ५० टक्के शेतातली माती लागते.. ३० टक्के शेणखत, २० टक्के रेती किंवा कोकोपीट लागेल. एका भांड्यात व्यवस्थित मिसळल्यानंतर एक कप पाणी घाला आणि नंतर पुन्हा मिक्स करा. नंतर सावली असलेल्या ठिकाणी ठेवा. दुसऱ्या दिवशी तुम्ही प्राजक्ताच्या  रोपाच्या मातीत हे मिक्स करू शकता. या रोपाला काही दिवसातंच फुलं लागलेली दिसून येतील.

फळांच्या सालीचे खत

फळांच्या साली प्राजक्ताच्या रोपाच्या कुंडीत घाला. त्यानंतर  उरलेली चहा पावडरसुद्धा कुंडीत घालू शकता. यानंतर मातीत चिमूटभर मीठ घाला नंतर एका भांड्यानं झाकून  १ आठवड्यासाठी तसंच सोडून द्या. एक आठवड्यानंतर खत तयार असेल या मातीचा वापर करून तुम्ही प्राजक्ताचं रोप लावू शकता. मोठ्या बादलीसमान कुंडीत प्राजक्ताचं रोप चांगलं वाढेल. फुलं नक्की येतील.

टॅग्स :बागकाम टिप्सलहान मुलं