पुदिना ही अतिशय आरोग्यदायी औषधी वनस्पती मानली जाते. त्यामुळे रोजच्या आहारात थोडा तरी पुदिना असावाच, असं आहारतज्ज्ञ नेहमीच सांगतात. पुदिना नियमितपणे खाल्ल्यास शरीरात पाचक एन्झाईम्स चांगल्याप्रकारे तयार होतात. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास फायदा होतो. तसेच पुदिन्यामुळे कफ, खोकला हा त्रासही नियंत्रित राहतो. पुदिन्यातून मिळणारे ॲण्टीऑक्सिडंट्स कॅन्सरचा धोका कमी करतात, तसेच त्वचेसाठीही ते खूपच पोषक असतात. त्यामुळे असा हा बहुगुणी पुदिना आता तुमच्या घरातल्या कुंडीतच लावून टाका (How to grow pudina or mint in terrace garden?) आणि रोजच्या रोज ताजा पुदिना खा (3 steps to grow pudina in your home garden)...
कुंडीमध्ये पुदिना कसा लावायचा?
पुदिना लावण्यासाठी तुमच्याकडे खूप मोठी जागा असावी, असं मुळीच नाही. एका पसरट आकाराच्या कुंडीत तुम्ही तुमच्या घराला पुरेल एवढा पुदिना निश्चितच लावू शकता.
छोट्याशा बाल्कनीत किंवा टेरेसमध्ये ही कुंडी सहज मावून जाईल आणि तुम्हाला रोजच्या रोज ताजा पुदिना मिळू शकेल. पुदिना लावायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला पुदिन्याच्या काड्या लागतील. तुम्ही जो पुदिना बाजारातून विकत आणाल, त्याच्यापैकी ४- ५ काड्या पुदिना लावण्यासाठी राखून ठेवा. या काड्यांच्या किंवा देठांच्या खालच्या भागातली पानं काढून टाका. वरची पानं तशीच राहू द्या.
आता एक अर्धा ग्लास भरून पाणी घ्या. त्या पाण्यात पुदिन्याची देठं बुडवून ठेवा. साधारण ६ ते ७ दिवसांनंतर त्या देठांना मुळं आलेली दिसतील.
७पदार्थ खा, केस पांढरेच होणार नाहीत
त्यानंतर ती देठं ग्लासमधून काढा आणि कुंडीतल्या मातीत थोड्या थोड्या अंतराने लावून टाका. काही दिवसांतच कुंडीतला पुदिना छान बहरून येईल. माती ओलसर राहील एवढं पाणी पुदिन्याला पुरेसं आहे. तसंच ती कुंडी खूप प्रखर उन्हातही ठेवू नये. एकदा लावला की पुदिना पसरत जातो. त्यामुळे त्यासाठी पसरट कुंडीच वापरावी.