Join us  

पुदिना विकत कशाला आणायचा? कुंडीत लावून टाका- भराभर वाढेल, नेहमीच ताजा पुदिना मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2024 9:24 AM

How To Grow Pudina Or Mint: पुदिना कुंडीमध्ये लावणं आणि तो वाढवणं अतिशय सोपं आहे. यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूया.... (gardening tips for growing pudina)

ठळक मुद्देपुदिना कुंडीत लावल्यानंतर ती कुंडी १० ते १५ दिवस तरी प्रखर उन्हात ठेवू नका. कारण सध्याच्या खूप तिव्र उन्हामुळे तो लगेचच कोमेजून जाऊ शकतो. 

पुदिन्याची जुडी बाजारात विकत घ्यायला गेलं तर १० ते १५ रुपयांत मिळते. बऱ्याचदा ती आपल्याकडून नीट निवडणं होत नाही. त्यामुळे मग तो बराचसा वाया जातो. शिवाय पुदिना हा असा एक पदार्थ आहे जो खाद्यपदार्थांना छान स्वाद देतो. त्यामुळे तो कधीही चटकन वापरायला अगदी हाताशी असला की बरं असतं. म्हणूनच आता बाजारातून नेहमीच पुदिना विकत आणण्यापेक्षा तुमच्याकडच्या एखाद्या छोट्याशा रिकाम्या कुंडीमध्ये लावून टाका (How to grow pudina or mint in terrace garden). बघा कुंडीमध्ये पुदिना कसा लावायचा आणि त्याची कशी काळजी घ्यायची... (gardening tips for growing pudina)

 

कुंडीमध्ये पुदिना कसा लावायचा?

पुदिना लावण्यासाठी एखादी मध्यम आकाराची पसरट कुंडी घ्या.

वजन कमी करायचंय? मग नाश्त्यामध्ये यापैकी कोणताही १ पदार्थ घ्या, सुटलेलं पोट होईल एकदम फ्लॅट...

यानंतर पुदिन्याच्या ४- ५ काड्या घ्या. या काड्यांच्या किंवा देठांच्या खालच्या भागातली पानं काढून टाका. वरची पानं तशीच राहू द्या.

आता एक अर्धा ग्लास भरून पाणी घ्या. त्या पाण्यात पुदिन्याची देठं बुडवून ठेवा. साधारण ६ ते ७ दिवसांनंतर त्या देठांना मुळं आलेली दिसतील.

 

त्यानंतर ती देठं ग्लासमधून काढा आणि कुंडीतल्या मातीत थोड्या थोड्या अंतराने लावून टाका. काही दिवसांतच कुंडीतला पुदिना छान बहरून येईल.

घरातले स्वीचबोर्ड खूप पिवळट- काळपट झाले? फक्त १ पदार्थ घेऊन झटपट करा स्वच्छ- चमकतील नव्यासारखे

माती ओलसर राहील एवढंच पाणी त्याला द्या. खूप जास्त पाणी घालू नका.

पुदिना कुंडीत लावल्यानंतर ती कुंडी १० ते १५ दिवस तरी प्रखर उन्हात ठेवू नका. कारण सध्याच्या खूप तिव्र उन्हामुळे तो लगेचच कोमेजून जाऊ शकतो.  

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणीगच्चीतली बाग