Join us  

गुलाबाला फुलंच येत नाहीत? कुंडीतल्या मातीत मिसळा ‘हा’ पदार्थ, गुलाबाला फुलंच फुलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 1:57 PM

How to Grow Rose At Home : गुलाबाला भरपूर फुलं यावी म्हणून काही खास घरगुती सोपे उपाय.

गुलाबाची सुंदरता आणि  त्याच्या सुगंधामुळे त्याला फुलांचा राजा म्हटलं जातं. शहरी भागांमध्येसुद्धा गार्डनमध्ये किंवा घरातील  कुंड्यांमध्ये गुलाबाची रोपं लावली जातात. ज्यामुळे संपूर्ण घर सुगंधित राहण्यास मदत होते. (Gardening Tips) गुलाबाची फुलं बाजारातून विकत आणून तुम्ही घरीसुद्धा छोट्या कुंडीत लावू शकता.

ग्राफ्टिंग विधीने गुलाब घरात लावू शकता.  गुलाबावर फार सुंदर कलमही करता येतं.  गुलाबाच्या रोपाला बरेच काटे असतात पण हे खूपच सावधगिरी बाळगून करायला हवं. (How to Grow Roses Plant At Home)

गुलाबाच्या रोपाच्या वाढीसाठी त्यात काय घालावे?

किचनमध्ये डाळ, तांदूळ धुतल्यानंतर त्यातून उरलेलं पाणी एकत्र करून तुम्ही गुलाबच्या रोपाला घालू शकतात. बटाटे उकडल्यानंतर त्यातून उरलेलं पाणी गुलाबाच्या रोपासाठी उत्तम ठरेल. या पाण्यातील घटक मातीसाठी फायदेशीर ठरतात. ज्यामुळे रोपांची वाढ चांगली होईल. शक्यतो नैसर्गिक खत आणि पाणी घाला. वेळेतर खत आणि पाणी न मिळाल्यास गुलाबाचे रोप व्यवस्थित फुलत नाही. 

केळ्याची साल

जर तुम्ही केळ्याची साल कचऱ्यात फेकत असाल तर असं करू नका.  एका जगमध्ये पाणी घालून त्यात केळ्याची सालं घालू शकता.  २ दिवस झाकून ठेवा. त्यानंतर हे पाणी गुलाबाच्या रोपात घाला. काही दिवसांतच गुलाबात फुलं यायला सुरूवात होईल. 

चालताना मांड्या घासल्या जातात-आग होते? ऋजुता दिवेकर सांगतात १ उपाय; जळजळ होईल दूर

गाईचे शेण

शेण  उत्तम खत असते.  मुठभर खत घाला आणि त्यात माती भरा. रोज न  चुकता पाणी घाला. या पद्धतीने भरपूर पोषण मिळेल आणि फुलं येतील.

तुरटी

एक पाण्याचा मग घ्या, त्यात १ चमचा  तुरटी पावडर घाला. नंतर रात्रभर पाण्यात सोडून द्या. सकाळी हे पाणी गुलाबाच्या मुळांमध्ये घाला.  काही दिवसांत गुलाबाच्या कळ्या येऊ लागतीत.

झाडू मारा-फरशी पुसा-भांडी घासा- पाहा कोणत्या कामानं किती कॅलरी बर्न होतात, घटवा वजन

कॉफी बीन्स

गुलाबाच्या रोपासाठी कॉफी बीन्स बऱ्याच फायदेशीर ठरतात. मुळांमध्ये कॉपी बीन्स वाटून घाला.  हे एखाद्या खताप्रमाणे काम करते. ज्यामुळे रोपांना न्युट्रिशन मिळते. 

व्हाईट व्हिनेगर

व्हाईट व्हिनेगर गुलाबाच्या रोपामध्ये खताचा वापर करू शकता. यासाठी लिक्विड खत किंवा पाण्यात व्हिनेगर मिसळून रोपाच्या मुळांमध्ये घाला. ज्यामुळे रोपाला भरभरून फुलं येतील.

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स