Join us  

ना माती ना कुंडी- फक्त १ बटाटा घेऊन गुलाबाच्या देठापासून तयार करा भरपूर फुलं देणारं रोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2024 9:15 AM

Gardening Tips: गुलाबाच्या देठापासून किंवा कलम लावून भरपूर फुलं देणारं रोप घरच्याघरी कसं वाढवायचं ते पाहा...(how to grow rose plant using potato?)

ठळक मुद्देसाधारण महिना- दिड महिन्यात ते रोप तुम्हाला भरभरून फुलं देईल. एकदा हा प्रयोग करून पाहा. 

गुलाबाचं टवटवीत फ्रेश फुल पाहिलं की आपल्यालाही कसं प्रसन्न वाटतं. घरातली किंवा घरासमोरची बाग लहान असो किंवा मग मोठी असो. त्यात गुलाबाचं एखादं रोप तरी असतच. गुलाबाचे अनेक वेगवेगळे रंग असतात. प्रत्येक रंगाचं फुल आपल्या घरात असावं असं वाटत असेल तर गुलाबाचं देठ घेऊन त्यापासून भरपूर फुलं देणारं गुलाबाचं रोप कसं वाढवायचं ते पाहा (how to grow rose plant using potato?).. यासाठी आपल्याला एका बटाट्याची गरज लागणार आहे. (best trick for the fast growth of rose plant)

 

गुलाबाचं कलम वापरून कसं तयार करायचं रोप?

हा उपाय करण्यासाठी तुमच्या आवडीच्या गुलाबाचं फुलं त्याच्या देठासकट घ्या. आता देठावरून गुलाबाचं फुल काढून टाका. तसेच त्या फांदीला जर इतर लहान लहान फांद्या, पानं असतील तर त्या ही छाटून टाका.

रात्री ९ ऐवजी संध्याकाळी ६ वाजता जेवल्याने तब्येतीवर काय परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात ४ कारणं

आता फुल जिथे होतं तिथून खाली साधारण ४ ते ५ सेमी अंतरावर गुलाबाच्या देठाला तिरका छेद द्या. छेद दिलेला भाग थोडा आल्याच्या तुकड्यावर घासून घ्या.

यानंतर एक बटाटा घ्या. त्याला छोटंसं छिद्र पाडा आणि गुलाबाच्या देठाचा जो भाग आल्याच्या तुकड्यावर घासला आहे, तो भाग त्या बटाट्यामध्ये खोचून द्या. 

 

यानंतर बटाटा आणि गुलाबाचा कलम एका प्लास्टिकच्या बरणीत टाका. त्या बरणीच्या आतल्या भागात थोडं पाणी शिंपडा आणि झाकण लावून ती बरणी जिथं स्वच्छ सुर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी ठेवा.

नवरात्रीपर्यंत डार्क सर्कल्स होतील गायब, ३ पदार्थांचा सोपा उपाय- थकलेले डोळे दिसतील चमकदार

साधारण १० दिवसांनंतर गुलाबाच्या देठाला छोटी छोटी पानं फुटल्याचं दिसून येईल. पुन्हा एकदा त्या बरणीत पाणी शिंपडा आणि झाकण लावून बरणी उन्हात ठेवून द्या.

त्यानंतर साधारण पुढच्या ७ ते ८ दिवसांत गुलाबाच्या कलमाला भरपूर पानं फुटलेली दिसतील. त्यानंतर मग ते रोप बरणीतून काढून घ्या. एका कुंडीत माती घाला. त्यात बटाट्याचे काप करून टाका आणि बटाट्यातलं रोप त्या कुंडीत लावा.

साधारण महिना- दिड महिन्यात ते रोप तुम्हाला भरभरून फुलं देईल. एकदा हा प्रयोग करून पाहा. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सबटाटागच्चीतली बाग