गुलाब, जास्वंदाची फुलं प्रत्येकालाच आवडतात. (How To Grow Rose Plants) घराच्या बाल्कनीमध्ये जास्वंद किंवा गुलाबाच्या फुलाचे रोप लावायला अनेकांना आवडते पण या फुलाची व्यवस्थित वाढ होत नाही फक्त पानच वाढतात. (Gardening Tips) गुलाबाच्या रोपाला फुलं येण्यासाठी त्याची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. (Gardening Tips In Marathi) अनेकदा भरपूर काळजी घेतल्यानंतरही फुलं व्यवस्थित वाढत नाहीत. (How to Grow Plants Faster and Bigger At Home) रोपांच्या चांगल्या वाढीसाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. गुलाबाच्या फुलांच्या वाढीसाठी तुम्ही महागड्या फर्टिलायजर्सचा वापर करण्यापेक्षा ५ ते १० रूपयांच्या नैसर्गिक फर्टिलायजर्सचा झाडांसाठी वापर करू शकता. (How To Grow Rose Plant Faster With 5 Rupees Indoor)
गुलाबाच्या रोपाची कटिंग कधी करावी? (Essential Tips On Growing Roses)
गुलाबाच्या पानांवर कोणतंही किड किंवा फंगस लागली असेल, ती काढून टाकली तर गुलाबाच्या रोपाची चांगली वाढ होऊ शकते. पानं पिवळी पडली असतील पानं सुकली असतील तर तुम्ही पानं कापून टाकू शकता. त्यानंतर रोपाला फुलंही येतील. गुलाबाच्या रोपांची कटींग केल्यानंतर त्यात नवीन माती आणि पाणी घाला. त्यानंतर थोडं सुकू द्या आणि हवा लागू द्या. माती कोरडी पडणार नाही याची काळजी घ्या. पण अगदी रोज पाणी घालू नका.
रोपाची फुलं गळून पडली असतील तर नॉड्स कापून टाका. फुलाच्या फांद्या कापू नका. गुलाब कलमाने उगवले जातात अशावेळी बियांची आवश्यकता नसते. गुलाबाच्या मुळांना हवा लागणं फार महत्वाचे आहे. माती स्वच्छ ठेवणंही महत्वाचे असते. त्यावर जर तण उगवले असेल आणि पानं पडली असतील तर ते लगेच बाजूला करा. माती खोदल्यानंतर जवळपास ३ दिवस सुकू द्या. काहीजण एक चूक करतात की माती खोदल्यानंतर त्यात लगेच पाणी घालतात. ज्यामुळे रोप अजिबात वाढत नाही.
५ रूपयांची वस्तू मातीत घाला (Grow Rose Plant Faster With 5 Rupees)
५ रूपयांच्या चॉकचा वापर करून तुम्ही रोपांना फुलवू शकता. चॉकचा वापर करून तुम्ही रोपांमध्ये फुलं उगवू शकता. ब्लॅकबोर्डवर वापरला जाणारा चॉक मातीत गाडून ठेवा. २ चॉक वापरून तुमचं पूर्ण काम होईल. गुलाबाच्या रोपाला कॅल्शियमची आवश्यकता असते. नंतर चॉक किसून मातीत मिसळा. खडू मुळे गार्डनिंगची २ काम सोपी होतील. त्यातलं १ म्हणजे मातीत मॉईश्चर टिकून राहील आणि दुसरं असं की रोपाला कॅल्शियम मिळेल. माती जास्त कोरडी किंवा ओली राहणार नाही याची काळजी घ्या. गुलाबाच्या रोपाची माती जास्त ओली असू नये.