जर तुम्हाला रोप लावण्याची आवड असेल तर तुम्ही स्पेशल गार्डन बनवत असाल तर आपल्या बगीच्यामध्ये किंवा बाल्कनीमध्ये गुलाबाचे रोप नक्कीच लावले असेल. गुलाबाच्या रोपाला लावल्यानंतर काळजी घेण्याची तितकीच गरज असते काही दिवसांनी रोपाची माती सुकली तर त्यात फुलं येत नाहीत (How To Grow Roses At Home). गुलाबाच्या झाडाला भरपूर फुलं येण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते तेव्हा हेल्दी फुलं येतात. (How To Bloom Roses At Home Gardening Tips In Marathi)
ट्रस्टबास्केटच्या रिपोर्टनुसार गुलाबाचे रोप वाढवण्यासाठी योग्य जागेची निवड करा. जिथे सुर्यप्रकाश आणि सावली दोन्ही येतील अशी जागा निवडा. गुलाबाच्या रोपासाठी ६.५ पीएच ते ६.८ च्या दरम्यान असावं. रोज प्लांटसाठी तापमान जवळपास १५ ते २८ डिग्रीमध्ये असावं. गुलाबाच्या रोपाची प्रुनिंग वेळोवेळी करायला हवी. गुलाबाच्या कुंडीला खाली पाणी निघण्यास छिद्र असेल पाहा.
केळीचे साल
जर तुम्ही केळीचे साल कचऱ्यात फेकत असाल तर असं करू नका. एक जग पाण्यात केळीचे साल छोटे छोटे कापून घाला आणि २ दिवस झाकून ठेवा. त्यानंतर पाण्याला गुलाबाच्या मुळांमध्ये घाला. काही दिवसांनी गुलाबाला फुलं आलेली दिसून येईल.
गाईचे शेण
गाईचे शेण एक उत्तम खाद्य आहे. तुम्ही सकाळच्यावेळी गुलाबाच्या मुळात माती काढून काहीवेळ ऊन्हात ठेवा. त्यानंतर खड्ड्यात मुठभर शेण घाला नंतर माती भरा. या पद्धतीने रोपांना भरपूर पोषण मिळेल आणि फुलं येऊ लागतील रोप बहरलेलं दिसेल.
तुरटी
एक पाण्याचा मग घ्या त्यात एक चमचा तुरटी मिसला. नंतर रात्रभर पाण्यात सोडून द्या. सकाळी हे पाणी गुलाबाच्या मुळांमध्ये घाला. या पद्धतीन काही दिवसातच गुलाबाच्या झाडाला कळ्या यायला सुरूवात होईल आणि भराभर फुलं येतील.
कॉफी बीन्स
गुलाबाच्या मुळांसाठी कॉफी फायदेशीर ठरते. रोपाच्या मुळाशी कॉफी बीन्स वाटून घातल्यास एका खाद्याप्रमाणे काम करतील आणि रोपाला पोषण मिळेल.