Join us  

ना कुंडी-ना जास्त जागा; प्लास्टीकच्या बाटलीत 'या' पद्धतीने लावा गुलाबाचे रोप; भरपूर येतील फुलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2024 10:49 AM

How to Grow Roses at Home : (Gardening Tips) : घरात बऱ्याच प्लास्टीकच्या बॉटल्स पडून असतात. अशावेळी चांगल्या क्वालिटीच्या बॉटल्स भंगारात टाकण्यापेक्षा तुम्ही गार्डनिंगसाठी याचा वापर करू शकता.

घराची शोभा वाढवण्यासाठी अनेक घरांमध्ये गुलाबाची रोपं लावली जातात. (Gardening Tips in Marathi) गुलाबाचे रोप बाजारातून आणणं सोपं पण ते व्यवस्थित वाढवणं तितकंच अवघड. (Plant Care Tips in Marathi) योग्य सुर्यप्रकाश, पाणी, खत या तिन्ही गोष्टींची वेळोवेळी काळजी घेतली तरच रोपाला पोषण मिळते आणि फुलांची वाढ होते. (How to Grow Rose Plant Faster in Plastic Bottles) गुलाबाचे रोप तुम्ही प्लास्टीकच्या बॉटलमध्येही लावू शकता.  घरात बऱ्याच प्लास्टीकच्या बॉटल्स पडून असतात. अशावेळी चांगल्या क्वालिटीच्या बॉटल्स भंगारात टाकण्यापेक्षा तुम्ही गार्डनिंगसाठी याचा वापर करू शकता. (How to Grow Roses From Cuttings in Plastic Bottles)

गुलाबाचे रोप बॉटलमध्ये कसे लावावे? (How to Grow Roses at Home)

सगळ्यात आधी  हे समजून घ्या की, मातीला प्लास्टीकच्या बॉटलमध्ये घातल्याने रोपाला पुरेसं पोषक वातावरण मिळतं. जे त्यांच्या साठी चांगले असते. यामुळे रोपाची वाढ भराभर होते. एक मोठी पाण्याची किंवा कोल्डड्रिंकची रिकामी बॉटल घ्या आणि मधोमध कापा. त्याआधी प्लास्टीकच्या बॉटलवरचे स्टिकर काढून टाका.  यात २ इंचाचा स्क्वेअर किवा सर्कल तयार करा. आता बॉटलचा एक्स्ट्रा पार्ट कापून टाका आणि मग रोपाची लागवड करा.

सगळ्यात आधी माती बाहेर काढून त्यात खत मिसळा. माती प्लास्टीकच्या बॉटलमध्ये भरून त्यात बियाणे घाला. या पद्धतीने रोप लावल्यास झाड चांगले वाढेल आणि चांगला रिजल्ट दिसून येईल.  जर तुम्ही बॉटलच्या मध्ये सर्कल तयार करणार नसाल तर तळाशी छिद्र पाडायला विसरू नका. 

जास्वंदाच्या रोपाला काळ्या मुंग्या लागतात-फुलंच येत नाही? मातीत 'हा' पदार्थ मिसळा, फुलांनी बहरेल रोप

बॉटलमध्ये झाड लावण्याचे फायदे  (Benefits of planting  roses in bottles)

मातीच्या कुंड्या जड असतात. वजन जास्त असल्यामुळे तुम्ही या कुंड्या हवेत टांगू शकत नाही. जेव्हा बॉटल हलकी असते हवंतेव्हा तुम्ही ही बॉटल बदलू शकता. कोणत्याही ठिकाणी तुम्ही हे रोप ठेवू शकता. जर कुंडीत रोप लावलं असेल तर ते एकाच ठिकाणी ठेवावे लागते. रोप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवताना तुटण्याची भिती असते.

या सर्व टिप्सबरोबरच गुलाबाच्या रोपासाठी खतही आवश्यक असते. केळी आणि संत्र्याचे सालं तसंच शेणापासून तयार केलेले खत गुलाबाच्या रोपाच्या फायदेशीर ठरते. गुलाबाचे रोप ४-५ तास सुर्यप्रकाशात ठेवा. फक्त १२ ते २ या वेळेत उन्हात ठेवू नका. केमिकल्सयुक्त खतांचा वापर करणं टाळा. घरातील ऑर्गेनिक खत घातल्यास रोप चांगले बहरून येईल. 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स