Join us  

गुलाब भरकन वाढतो-पण फुलंच येत नाही? १० रूपयांचे ३ पदार्थ मिसळा, गुलाबाने बहरेल बाल्कनी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2024 6:24 PM

How to Grow Roses At Home : गुलाबाच्या  रोपासाठी लिक्वीडचीसुद्धा आवश्यकता असते. तुम्ही घरच्याघरी १० मिनिटांत लिक्विड तयार करू शकता.

गुलाबाचे झाड घरात (Rose Plant) उगवणं सोपं नाही. पण त्याची काळजी घेणं सर्वांनाच माहीत असतं असं नाही. मार्केटमधून आणललेल्या गुलाबाच्या झाडात काही वस्तू मिसळल्या तर त्याची वाढ  चांगली होते. गुलाबाच्या झाडाची पानं पिवळी पडतात. (How to Plant And Grow Roses) पानंच वाढतात फुलं येत नाहीत अशी अनेकांची तक्रार असते. गुलाबाचे झाड वाढवण्यासाठी काही सोपे हॅक्स उपयोगी ठरू  शकतात. (How to Grow Roses At Home)

१० रूपयांत  गुलाबासाठी बनवा लिक्वीड

गुलाबाच्या  रोपासाठी लिक्वीडचीसुद्धा आवश्यकता असते. तुम्ही घरच्याघरी १० मिनिटांत लिक्विड तयार करू शकता. हे लिक्विड बनवण्यासाठी सगळ्यात आधी १ पॅकेट इनो घ्या. नंतर इनो पाण्यात घालून मिक्स करून घ्या त्यात अर्धा चमचा मीठ घालू शकता. हे लिक्विड एका बरणीत भरून ठेवा. 

आठवड्यातून एकदा या लिक्विडचा स्प्रे झाडांवर करू शकता. ज्यामुळे झाडांना पोषण मिळेल आणि फुलांची वाढ भराभर होईल. हे लिक्विड रोपांमध्ये घातल्यानंतर गुलाब फुललेले दिसून येतील.  गुलाबाच्या रोपाला अनेकदा किड लागते.  हे टाळण्यासाठी तुम्ही लिक्विडचा वापर करू शकता. 

बदाम-पनीर रोज खाणं परवडत नाही? १० रूपयांत चारपट जास्त प्रोटीन देतात २ पदार्थ; ताकद येईल

गुलाबच्या रोपासाठी खत कसे तयार करावे?

बदलत्या वातारवणात इनोचा वापर करून तुम्ही झाड बहरलेलं ठेवू शकता. आठवड्यातून  एकदा झाडांना पाणी घाला. या ट्रिक्सचा वापर केल्यास गुलाब कोमेजणार नाही आणि नेहमीच  चांगली वाढ होत राहील. 

केळ्याच्या सालीपासून करा नैसर्गिक खत

केळ्याच्या सालीपासून तयार झालेलं खत रोपांसाठी आवश्यक असते.   हे खत तयार करण्यासाठी सगळ्यात आधी साली काढून एकत्र करून घ्या.  नंतर ही सालं काढून पातळ तुकड्यांमध्ये  चिरा. एका भांड्यात पाणी उकळण्यासाठी ठेवा त्यानंतर त्यात हे तुकडे घालून शिजवून घ्या. नंतर पाणी काढून  घ्या. ही सालं 3 ते 4 दिवस अशीच ठेवा तयार आहे ऑर्गेनिक खत.

पोटभर भात खा १ किलो पण वजन वाढणार नाही; भात करण्याची १ सोपी पद्धत, स्लिम दिसाल

तुरटी 

एका जगमध्ये एक चमचा  तुरटी घाला.  रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा.  सकाळी हे पाणी गुलाबाच्या मुळांवर शिंपडा. गुलाबाच्या झाडाला  काही दिवसांत कळ्या येतील आणि फुलांनी घर बहरेल.

कॉफी बिन्स

गुलाबाच्या झाडासाठी कॉफी बीन्स फायदेशीर ठरतात. गुलाबाच्या मुळांमध्ये कॉफी बीन्स वाटून घाला. यामुळे झाडांना न्युट्रिशन मिळेल आणि रोपांची चांगली वाढ होईल. 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स