Join us  

गुलाबाचे रोप वाढते पण फुलंच नाही? मातीत मिसळा १ घरगुती गोष्ट; पावसाळ्यात फुलांनी बहरेल झाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2024 1:49 PM

How to Grow Roses: The Complete Rose Flower Guide in Monsoon : गुलाबाच्या रोपाला फुलं येत नसतील तर, एक घरगुती उपाय करून पाहा..

लाल, गुलाबी, बेरंगी गुलाब कोणाला नाही आवडत (Gardening Tips). काही जणांना गुलाब आपण भेट म्हणून देतो. तर काही जण आवड म्हणून कुंडीत गुलाबाचे रोप लावतात (Rose Flower). गुलाबाच्या रोपामुळे छोट्याशा बाल्कनीची शोभा वाढते. पण गुलाबाच्या रोपाची व्यवस्थित काळजी घेतल्यास त्याला फुलं छान येतात (Grow Roses). पण योग्य काळजी घेतली नाही तर, रोप सुकते, किंवा रोपट्याला मनासारखी फुलं येत नाही.

जर आपल्याला घरातल्या गुलाबाच्या रोपट्याला फुलं येत नसतील तर, ४ टिप्सचा वापर करून पाहा. यामुळे रोपट्याला भरभरून फुलं येतील, शिवाय भरपावसातही फुलं कोमेजणार नाही. पावसाळ्यात गुलाबाच्या रोपट्याची नेमकी कशी काळजी घ्यावी. पाहूयात(How to Grow Roses: The Complete Rose Flower Guide in Monsoon).

कुंडीतल्या मातीची अशी घ्या काळजी

गुलाबासाठी माती शेणखत आणि इतर पोषक घटक मिसळून तयार करावी. गुलाबाच्या कुंडीतली माती ओलसर असावी. यामुळे गुलाबाची योग्य वाढ होईल. तसेच, माती ओलसर राहण्यासाठी वेळोवेळी खोदत राहा. जेणेकरून कुंडीत पाणी घातल्यानंतर ओलावा कायम राहील.

पावसाळ्यात घरात डास - चिलटांचा उच्छाद? ४ घरगुती उपाय, त्रास होईल कमी - घर स्वच्छ

रोपांना स्प्रिंकलरद्वारे पाणी द्या

झाडे लावल्यानंतर त्यांना सूर्यप्रकाश, खत आणि पाणी आवश्यक आहे.  झाडांना जास्त पाणी घालण्याची चूक करू नका. कारण पावसाळ्यातील पाणी झाडांना मिळत असतेच. आपण दिवसातून एकदा झाडांना स्प्रिंकलरद्वारे पाणी देऊ शकता. यामुळे झाडांची योग्य वाढ होईल.

शेणखताचा करा वापर

गुलाबाच्या कुंडीत महिन्यातून किमान दोनदा शेणखत घाला. गुलाबाच्या झाडांना कॅल्शियमची गरज असते. आपण पावसाळ्यात कुंडीतल्या मातीत कॅल्शियमयुक्त खताचा वापर करू शकता. किंवा घरगुती खात तयार करू शकता. यामुळे झाडाची योग्य वाढ होईल.

रोजच्या भाकरीला द्या नवा ट्विस्ट, कधी पौष्टीक मसाला भाकरी ट्राय करून पाहिली आहे का? टिफिनसाठीही बेस्ट

नैसर्गिक खताचा वापर करा

गुलाबाच्या रोपांसाठी नैसर्गिक खताचा वापर करा. यासाठी आपण भाज्यांच्या आणि फळांच्या सालींचा वापर करू शकता. यामुळे झाडांना मुबलक पोषक तत्वे मिळतील आणि माती देखील ओलसर राहील.

टॅग्स :बागकाम टिप्ससोशल व्हायरलमोसमी पाऊस