Lokmat Sakhi >Gardening > छोट्याशा कुंडीतही लावू शकता केसर; घरीच कमी जागेत केशर लावण्याची सोपी ट्रिक, मिळेल शुद्ध केसर

छोट्याशा कुंडीतही लावू शकता केसर; घरीच कमी जागेत केशर लावण्याची सोपी ट्रिक, मिळेल शुद्ध केसर

How to Grow Kesar at Home Easily : घरच्याघरी केसर लावण्याच्या सोप्या ट्रिक्स पाहूया.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 01:54 PM2023-12-29T13:54:37+5:302023-12-29T15:27:52+5:30

How to Grow Kesar at Home Easily : घरच्याघरी केसर लावण्याच्या सोप्या ट्रिक्स पाहूया.

How to Grow Saffron at Home : How to Grow Kesar at Home Easily How to Grow Saffron Indoor | छोट्याशा कुंडीतही लावू शकता केसर; घरीच कमी जागेत केशर लावण्याची सोपी ट्रिक, मिळेल शुद्ध केसर

छोट्याशा कुंडीतही लावू शकता केसर; घरीच कमी जागेत केशर लावण्याची सोपी ट्रिक, मिळेल शुद्ध केसर

केशरला धरतीचे सोनं असं म्हटलं जाते. केशर हा जगातील सगळ्यात महागडा मसाला आहे. सोन्या, चांदीप्रमाणे केशराला किंमत मिळते. केशराची शेती मुख्यत: जम्मू काश्मिर आणि हिमाचल प्रदेशाच्या काही भागात केली जाते. (Gardening Tips Evryone Should Know) कृषी वैज्ञानिकांच्या परिक्षणानंतर  मैदानी प्रदेशात ही शेती केली जाते. (How to Grow Saffron at Home) याची शेती करण्यासाठी तापमान नियंत्रित करण्यात करण्याची गरज असते. घरच्याघरी केशर लावता येते का, यासाठी बियाणं कोणती वापरावीत? असा प्रश्न अनेकांना पडतो. घरच्याघरी केसर लावण्याच्या सोप्या ट्रिक्स पाहूया. (Gardening Tricks)

घरच्याघरी कमी जागेत केशर कसे उगवायचे? (How to Plant and Grow Saffron)

केशराचे छोटे बल्बज तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. लसणाप्रमाणे याचा आकार दिसतो. शेंडी असलेला भाग वरच्या दिशेने ठेवा आणि सपाट बेस मातीत ठेवा. मातीत रेती मिसळायला विसरू नका.  मातीत हे केसरचे बल्बज लावल्यानंतर काही दिवसांतच कोंब फुटू लागतील. याला कोणत्याही रासायनिक खतांची आवश्यकता नसते. 

केसर तुम्ही एयरोपोनिक्सच्या मदतीने  घराच्या छतावरही उगवू शकता. बिना माती किंवा बिना पाण्याच्या शेतीला एयरोपोनिक्स असं म्हणतात.  केशर उगवण्यासाठी  दिवसा २० तर रात्री १० डिग्री तापमान आवश्यक असते. शिवाय केशर उगवण्यासाठी याच्या देखरेखीसाठी अनेक मशिन्स लागतात. ज्यातून  पोषण मिळते. केसर घरी उगवणं सोपं आहे त्यासाठी एक रिकामी खोली लागेल. चांगली बियाणे, माती-खत आणि पाणी याशिवाय रूम टेम्परेचर कंट्रोल करण्याची आवश्यकता असेल.  केसर एयरोपोनिकक्सच्या मदतीने उगवू  शकता. 

रात्री लवकर झोपच येत नाही? खोलीत 'ही' ५ रोपं ठेवा, रात्रभर लागेल गाढ-शांत झोप

कुंडीत केसरचे बल्बज लावल्यानंतर लगेच पाणी घाला.  ग्रोईग सिजनमध्ये प्रत्येक आठवड्याला अर्धा इंच पाण्याची आवश्यकता असते. ज्या ठिकाणी ४ ते ६ तास ऊन येत असेल अशा ठिकाणी  केसरचं रोप ठेवा आणि केसराच्या रोपासाठी जैविक लिक्विड खतांचा वापर करा. जेणेकरून चांगली वाढ  होईल.

केसराचे रोजच्या वापरातले फायदे (Benefits of Saffron)

१) केसराचे पाणी त्वचेला चमकदार होते. यामुळे सोरायसिस, एक्जिमा यांसारख्या समस्यांवर आराम मिळतो.

२)  हे प्यायल्याने पिरीएड्स पेनपासून आराम मिळतो. पिंपल्सची समस्याही दूर होते. तर पोटाचे आरोग्य चांगले राहते.

3) केसराचे पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यात चिमूटभर केसर, बदाम, वेलची आणि मध घालून द्रावण तयार करा. त्यानंतर थंड करून याचे सेवन करा. 

४) केशराचे दूध प्यायल्यानं हाडांना बळकटी मिळते आणि इम्यूनिटी वाढण्याही मदत होते. 

Web Title: How to Grow Saffron at Home : How to Grow Kesar at Home Easily How to Grow Saffron Indoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.