Join us  

बाल्कनीत लावलेल्या टोमॅटोच्या रोपलाही येऊ शकतात भरपूर टोमॅटो, बघा कुंडीमध्ये कसं लावायचं रोप....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2023 9:11 AM

Gardening Tips For Tomato Plants: कुंडीमध्ये टोमॅटोचं रोप लावणं सोपं आहे. ते कसं लावायचं, त्याची काय काळजी घ्यायची ते आता पाहूया...

ठळक मुद्देअगदी ६० दिवसांत तुम्ही तुमच्या कुंडीतले टोमॅटो खाऊ शकाल. करून बघा. या रोपट्याला ५ तास चांगले ऊन मिळाले तरी पुरेसे आहे. 

हल्ली बाजारातून कोणताही भाजीपाला घेतला तरी त्यावर खूप किटकनाशकं फवारलेली असतात. अर्थात ते आपण स्वच्छ धुवून मगच खातो.. पण अशा पद्धतीची केमिकल्स न वापरलेली आणि अगदी ऑरगॅनिक पद्धतीने पिकवलेली भाजी आपल्याला आपल्याच घरात उगवता आली तर.... कुणालाही ही संकल्पना आवडण्यासारखीच आहे (Tomato plantation in home garden). पण आता जागा आणि वेळ या दोन्ही गोष्टींमुळे आपल्याला ते शक्य नाही. त्यामुळेच जो काही सोपा भाजीपाला शक्य आहे, तो तर आपण आपल्या छोट्याशा अंगणात, कुंडीत नक्कीच लावू शकतो. मागे आपण पुदिना आणि कोथिंबीर कशी लावायची ते पाहिलं, आता आपण टोमॅटो कसे लावायचे ते पाहूया... (How to grow tomato in terrace garden?)

कुंडीमध्ये टोमॅटो कसे लावायचे?

 

कुंडीमध्ये आपण टोमॅटोचं रोप कसं लावू शकतो, याविषयीचा व्हिडिओ mission_green_mumbai या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

आरोग्यासाठी घातक असणाऱ्या 'या' ३ वस्तू तुमच्याही घरात आहेत? बघा कोणत्या वस्तू आणि काय त्यांचे दुष्परिणाम

या व्हिडिओनुसार टोमॅटोचं रोप लावण्यासाठी सगळ्यात आधी तर तुमच्या घरात असलेला कोणताही फ्रेश टोमॅटो घ्या. त्याच्या आडव्या गोलाकार चकत्या करा. ४ ते ५ चकत्या कुंडीमध्ये ठेवून द्या. त्यावर मातीचा एक थर द्या आणि त्याला रोज थोडे थोडे पाणी घाला.

 

काही दिवसांनंतर बियांमधून छोटे छोटे रोपं फुटू लागतील. ही रोपं एकदा थोडी मोठी झाली की ती आपल्याला मोठ्या कुंडीमध्ये हलवावी लागतात.

पणती सजविण्याच्या एकापेक्षा एक सुंदर ६ आयडिया, नुसत्याच रंगरंगोटीपेक्षा असं काहीतरी कल्पक करा....

त्यासाठी एक मोठी कुंडी घ्या. त्या कुंडीमध्ये ९० टक्के माती आणि १० टक्के कंम्पोस्ट टाका. आता छोट्या कुंडीत फुटलेली टोमॅटोची रोपं मोठ्या कुंडीमध्ये हलवा. हलवतना त्या राेपांच्या मुळांभोवतीचं मॉईश्चर टिकून राहावं, यासाठी टिश्यू पेपरचा वापर करा.

 

आता मोठ्या कुंडीत मधोमध एक प्लास्टिकची बाटली उलटी करून मातीत खोचून ठेवा. या बाटलीला अनेक लहान लहान छिद्रे करा. त्या बाटलीमध्ये केळी, कांद्याच्या साली असे ऑरगॅनिक खत टाका.

आलिया ते परिणिती- बघा मिनिमम मेहेंदीचा लग्नातला नवा ट्रेण्ड 

या खतामुळे रोपट्याची जोमाने वाढ होईल आणि अगदी ६० दिवसांत तुम्ही तुमच्या कुंडीतले टोमॅटो खाऊ शकाल. करून बघा. या रोपट्याला ५ तास चांगले ऊन मिळाले तरी पुरेसे आहे. 

 

 

टॅग्स :बागकाम टिप्सगच्चीतली बागइनडोअर प्लाण्ट्सपाणीटोमॅटो