Join us  

How to Grow Tomatoes at Home : कुंडीत लावा टोमॅटो, लालचुटुक टोमॅटो घरच्याघरी- महाग झाले तरी चिंता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2022 4:02 PM

How to Grow Tomatoes at Home : घरच्या घरी टोमॅटोचे पीक घेणे फार अवघड नाही, महाग झाले तरी चिंता न करता घरीच पिकवा रसदार टोमॅटो...

ठळक मुद्देझाडाकडे नियमित व्यवस्थित लक्ष देऊन त्याला वेळोवेळी आवश्यक किटकनाशके मारणे गरजेचे असते. रोप थोडे आतपर्यंत खोचले तर ते चांगले येते, वरचेवर असेल तर ते मातीत मुरण्यास वेळ लागतो. 

टोमॅटो हा आपल्याला सतत लागणारा पदार्थ. भाजीच्या वाटणापासून ते कोशिंबीरीपर्यंत आणि सॉसपासून ते चटणीपर्यंत वेगवेगळ्या कारणांसाठी टोमॅटो वापरला जातो. स्वयंपाकात आवर्जून वापरला जाणाऱ्या टोमॅटोने शंभरी गाठली आणि घराघरांत टोमॅटो खाणे बंद झाले. पण असे करण्यापेक्षा आपण आपल्या किचन गार्डनमध्येच टोमॅटो पिकवला तर? How to Grow Tomatoes at Home अगदी सहज सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी टोमॅटोचे पीक घेऊ शकतो. यासाठी फारसे कष्ट तर लागणार नाहीतच, पण आपल्या हाताने पिकवलेली गोष्ट आपण खातोय याचा आनंदही वेगळाच. शिवाय इतके महागडे टोमॅटो विकत आणायचीही गरज नाही. पाहूया टोमॅटो लावण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या...

(Image : Google)

१. टोमॅटो हे साधारणपणे थंड वातावरणात येत असल्याने उन्हाळा संपत आला की आपण टोमॅटोची लागवड करु शकतो. जास्त चिकट माती सोडून कोणत्याही मातीत टोमॅटोच्या बिया घातल्या तर २१ ते २७ डीग्री सेल्सिअस तापमानाला हे पीक येते. ही कुंडी उबदार आणि सावलीत ठेवल्यास बियांतून कोंब यायला साधारण १० ते १२ दिवस लागतात. 

२. टोमॅटो चांगले यावेत यासाठी माती चांगली असणे आणि तिच्यातील मॉईश्चर टिकवून ठेवणे अतिशय गरजेचे असते. अंकुर येत नाही तोपर्यंत या बियांना अतिशय कमी पाणी घालायचे. जास्त प्रमाणात चिखल झाल्यास त्यातून अंकुर फुटणे अवघड होते. चुकून असे झालेच तर ही कुंडी हवेशीर ठिकाणी ठेवावी. 

३. एकदा बियांतून अंकुर आला की हे रोप भरभर वाढावे यासाठी सूर्यप्रकाशात ठेवायला हवे. जितका चांगला सूर्यप्रकाश मिळेल तितके हे रोप जास्त छान फुलेल. रोप वाढायला लागले की त्याला फुले येतात आणि हळूहळू त्यातून टोमॅठो येऊ लागतात. मात्र या टोमॅटोचे वजन रोपापेक्षा जास्त असल्याने रोप खाली वाकते आणि टोमॅटोची पुरेशी वाढ होत नाही. असावेळी कुंड्यांमध्ये रोपाच्या आकाराच्या दांड्या लावून रोपाला आधार द्यायला हवा, जेणेकरुन पिक चांगले येईल. 

४. मातीतील मॉईश्चर चांगले असेल तर रोपाला ओलावा मिळतो आणि त्याची चांगली वाढ होते. अनेकदा आपण पाणी टाकले की ते रोपाच्या मुळाशी जाते आणि रोपाच्या वरची माती कोरडी होऊन जाते. मात्र रोपाच्या वरच्या भागातही मॉईश्चर टिकून राहील यासाठी स्प्रे किंवा थेंबथेंब पाणी रोपात पडेल असे पाहावे. 

(Image : Google)

५. आपले टोमॅटो चांगले मोठे आणि रसदार यावेत असे वाटत असेल तर टोमॅटोचे रोप चांगल्या नर्सरीतून आणायला हवे. इतकेच नाही तर कुंडी थोडी मोठी आणि जास्त जागा असलेली हवी. रोप थोडे आतपर्यंत खोचले तर ते चांगले येते, वरचेवर असेल तर ते मातीत मुरण्यास वेळ लागतो. 

६. टोमॅटो पूर्ण यायला २ ते २.५ महिने लागतात. त्यामुळे आपल्याला सतत आपल्या रोपाला फुलं किंवा टोमॅटो का येत नाहीत असा प्रश्न पडत असेल तर हे आधी माहित असायला हवे. टोमॅटोच्या झा़डावर किड पडण्याची शक्यता असते. कधी आळ्या तर कधी पांढरी किड हे झाड खाऊन टाकते. अशावेळी झाडाकडे नियमित व्यवस्थित लक्ष देऊन त्याला वेळोवेळी आवश्यक किटकनाशके मारणे गरजेचे असते. 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सभाज्या