Join us  

तुळस जरा वाढली की लगेच पानं सुकतात? मातीत 'हा' पदार्थ मिसळा, १० दिवसांत बहरेल तुळस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 3:00 PM

How To Grow Tulsi At Home : तुळशीला चांगला बहर येण्यासाठी आणि या रोपाची योग्य काळजी घेण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. (How To Grow Tulsi At Home)

तुळशीच्या पानाचे घरांत अधिकच महत्व असते. (Tulsi Leaves) तुळस घरातील एक महत्वपूर्ण रोपापैकी एक आहे. याचे धार्मिक महत्वही आहे. आरोग्याच्या दृष्टीनेही अनेक फायदे आहेत. (Gardening Tips) किटकनाशकांच्या वाढत्या संख्येमुळे तुळशीची पानं सुकतात तुळशीच्या पानांवर कधी किड लागते तर पानं सुकून जातात. (Easy Fastest Method of Growing Tulsi) तुळशीला चांगला बहर येण्यासाठी आणि या रोपाची योग्य काळजी घेण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. (How To Grow Tulsi At Home)

तुळशीचे रोप लावता त्यात जास्त पाणी घालू नका. अन्यथा मुळांना बुरशी येऊ शकते. याच कारणामुळे तुळशीचे रोप लावताना त्यात ७० टक्के माती आणि  ३० टक्के रेतीचा वापर करा. अशात पावसाच्या दिवसांत पाणी जास्तवेळ टिकणार नाही आणि जास्त दिवस बहरलेलं राहील. अर्बन माळी.कॉमच्या रिपोर्टनुसार तुळस लावण्यासाठी कमीत कमी ६ तास ऊन येईल अशी जागा निवडा. वेळच्यावेळी पाणी देणं गरजेचं आहे. सुकलेली, पिवळी पानं काढून टाका. ऑर्गेनिक खतांचा जास्तीत जास्त वापर करा. तुळशीच्या सेवनाने पचनक्रिया चांगली राहते.  रोगप्रतिकारकशक्ती वाढते,  ताण-ताणाव कमी होतो, डिप्रेशन दूर होण्यास मदत होते. 

१) कडुलिंबाच्या तेलाचा वापर करा

तुळशीच्या पानांचा वापर करून तुम्ही किटकनाशकांपासून बचाव करू शकता. यासाठी कडुलिंबाच्या तेलाचा वापर करा. कडुलिंबाच्या तेलात विषारी घटक नसतात. हा एक बायोडिग्रेडेबल पर्याय असतो.  यासाठी तुम्हाला १ लिटर पाण्यात २ मोठे चमचे कडुलिंबाचे तेल मिसळून स्प्रे तयार करावा लागेल.  त्यानंतर झाडांवर स्प्रे करा. यामुळे किटकनाशकांपासून तुळशीचा बचाव होईल आणि कोणतीही हानी होणार नाही.  

२) मीठाचा वापर करून किटकांपासून बचाव

मीठ एक उत्तम किटकनाशक आहे. यात माती शोषण्याची क्षमता असते. १ लिटर पाण्यात १ मोठा चमचा मीठ मिसळून स्प्रे तयार करा आणि रोपांवर शिंपडा.  या उपायाने तुळशीच्या पानांवर किटक येणार नाहीत आणि पानांचीही चांगली ग्रोथ होईल.

हाडांना पोकळ बनवते व्हिटामीन बी-१२ ची कमतरता; नियमित ५ व्हेज पदार्थ खा-खूप ताकद येईल

३) वॉटर जेट

किटकनाशक जास्त असतील तर त्याचा सोपा उपाय म्हणजे पाण्याचा स्प्रे. एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरून संक्रमित भागांवर शिंपडा यामुळे सगळे किटकनाशक रोपापासून लांब राहतील. 

ऐन तारूण्यात कंबरदुखीने हैराण आहात? ५ पदार्थ खा; म्हातारे झालात तरी कंबरदुखी छळणार नाही

४) डिश सोप

नॉन डिटर्जेंट किंवा डिश सोपचा वापर किटकनाशकांच्या स्वरूपात केला जातो. अर्धी बादली पाण्यात ४ ते ५ मोठे चमचे डिश सोप मिसळा आणि स्प्रे बॉटलमध्ये भरा. स्प्रे केल्यानंतर हात स्वच्छ धुवून सुकवून घ्या. हे लिक्वीड स्प्रे बॉटलमध्ये भरून त्याचा स्प्रे रोपांवर करा त्यामुळे  झाडांची वाढ भराभर होईल. 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स