तुळशीचं रोप (Tulsi) भारतीय घरांमध्ये प्रत्येकाचाच घरी असते. धार्मिक आणि वैद्यकीय दोन्ही दृष्टीने तुळशीचे महत्व आहे. तुळशीच्या रोपाची वाढ होत नाही अशी अनेकांची तक्रार असते. (Tulsi Plant) तुळशीच्या पानांच्या सेवनाने अनेक आजारांपासूनही लांब राहता येते. तुळशीचा वेगवेगळ्या प्रकार वापर तुम्ही करू शकता. (Gardening Tips) कोणत्याही ऋतूत तुळस लावली तरी थोडीच वाढते नंतर तुळशीला पानंच येत नाहीत अशी अनेकांची तक्रार असते. तुळस चांगली वाढण्यासाठी मातीत नैसर्गिक खतांचा वापर करायला हवा. घरगुती खतांच्या वापराने तुळस बहरते आणि पानंसुद्धा भराभर वाढतात. (How To Grow Tulsi Plant Naturally)
तुळशीसाठी नैसर्गिक खत कसं तयार करायचं (How To Make Natural Fertilizer For Tulsi Plant)
तुळशीसाठी नैसर्गिक खत तयार करण्यासासाठी १ ग्लास पाण्यात घ्या. पाण्यात १ चमचा आंबट दही घाला. ४ ते ५ दिवसांपूर्वीचे दही घ्या. दही जास्त प्रमाणात घेऊ नका. १ ग्लास पाण्यात १ चमचा दही मिसळून घ्या. त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने ढवळून व्यवस्थित एकजीव करा. यात १ ते २ चिमूट हळद पावडर घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स केल्यानंतर हे फर्टिलायजर तयार झालेलं असेल.
हाऊस डायजेस्टच्या रिपोर्टनुसार दही रोपांसाठी एक सुरक्षित आजार-निवारक म्हणून काम करते. दह्यातील प्रोबायोटीक्स बुरशीजन्य रोगांपासून बचाव करतात. दह्याच्या पाण्याचा स्प्रे केल्यानं किंवा अर्धा चमचा दही मातीत मिसळल्यानंही रोपं चांगली वाढतात. तुम्ही बागेत कंपोस्ट खत घालताना त्यात दही मिसळू शकता. दह्यामुळे कंपोस्ट अधिक सुक्ष्मजंतू तयार होतात आणि विघटन प्रक्रिया गतीने होते.
महिन्यातून एकदा हे खत तुळशीच्या पाण्यात घाला. या उपायामुळे तुळस दाट होईल आणि हिरवीगार पानं तुळशीला येतील. हे खत तयार करण्यासाठी तुम्हाला जराही खर्च येणार नाही. किचनमध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यांचा वापर करून तुम्ही तुळशीसाठी हे खत बनवू शकता. ज्यामुळे तुळस दाट आणि बहरलेली राहील. याशिवाय तुलशीच्या रोपाला लागलेली बुरशीसुद्धा निघून जाईल.
तुळस चांगली वाढण्यासाठी काय करावे (How to Protect Tulsi Plant)
तुळस चांगली वाढावी खराब होऊ नये यासाठी तुळशीची सुकलेली पानं वेळेच्यावेळी काढून टाका. तुळशीच्या मंजिरी काढून घ्या. तुळशीची रोपं सुकण्याची अनेक कारणं असू शकतात. गरजेपेक्षा जास्त पाणी देणं, खत घालणं आणि कमी धूप मिळणं ही मुख्य कारणं आहेत. याशिवाय किडे लागल्यामुळेही तुळशीची पानं सुकू शकतात.
जेवणानंतर फक्त १ चमचा या बीया खा; कोलेस्टेरॉल-बीपी कंट्रोलमध्ये येईल; पोट नीट साफ होईल
तुळस बहरलेली राहण्यासाठी तुम्ही त्यात शेण आणि कडुलिंबाची पानं घालू शकता. सगळ्यात आधी गाईचे शेण सुकवून घ्या. त्यानंतर याचा चुरा बनवून मातीत घाला कडुलिंबाची पानं सुकवून त्याची पावडर करू मातीत घाला. यातून तुळसीला पोषक तत्व मिळतील आणि तुळशीची चांगली वाढ होईल.