अंगणातली तुळस बहरु लागली की, घराला घरपण येतं असं म्हटलं जातं. तुळशीचे रोप हे आयुर्वेदात महत्त्वाचे मानले आहे. (Tulsi plant care tips) तुळशीचा जितका उपयोग आयुर्वेदात होतो तितकाच धार्मिक कार्यात. असं म्हटलं जातं की, तुळस दारात असेल तर आपल्याला ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात मिळतं. (Growing Tulsi plant indoors) यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहे. सर्दी-खोकल्यावर तुळशीचा काढा, पिंपल्सच्या समस्यांवर तुळशीची पेस्ट, टोनर आणि इतर अनेक गोष्टींसाठी तुळस बहुगुणी ठरते. (Tulsi plant gardening guide)
परंतु, तुळशीची योग्यप्रकारे काळजी न घेतल्यास ती सुकू लागते. हिवाळ्यात पुरेशा प्रमाणात सुर्यप्रकाश मिळाला नाही तर किंवा उन्हाळ्यात अधिक प्रमाणात सूर्यप्रकाश मिळाला तर रोपाचं नुकसान होतं.(How to plant and nurture Tulsi) तसेच तुळशीला अधिक प्रमाणात पाणीही घालू नये त्यामुळे पानं सुकणे, कोमजणे आणि कमकुवत होणे यांसारख्या समस्या उद्भवू लागतात. तुळशीचे रोप लावताना मातीत एक घरगुती खत टाकल्यास उन्हाळ्यातही तुळशीचे रोप कायम बहरत राहिल.
हा पावडर वापरा
तुळशीच्या मातीत पोषक गुणधर्म वाढतात. यामुळे झाड हिरवेगार आणि दाट होते. तसेच कीटक आणि मुंग्या देखील मातीत राहात नाही. तुळशीच्या रोपात शेणखत, लाकडाची राख आणि कॉफी पावडर टाकल्यास ती सुकत नाही. या पावडरमध्ये अनेक पोषक घटक असतात जे कीटकांच्या रोगांना रोपट्यावर हल्ला करु देत नाही. कॉफी पावडरमध्ये नायट्रोजन, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखे घटक असतात. जे झाडाचे पोषण करुन रोपाला दाट बनवतात.
कसे वापरायचे
तुळशीच्या रोपात शेणखत, लाकडाची राख आणि कॉफी पावडरचा वापर करणे फायदेशीर आणि उपयुक्त ठरते. राखेत एक चमचा कॉफी पावडर मिसळून तुळशीच्या मातीत घाला. हे खत महिन्यातून एकदाच वापरावे. असं केल्याने तुळशीच्या रोपाला पुरेशा प्रमाणात पोषक तत्वे मिळतील. रोपाला नवीन पानेही येतील. ज्यामुळे रोपटे दाट आणि जाड होईल.