घरोघर तुळशीचे रोप असतेच. तुळस सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानली जाते. तुळशीमध्ये औषधी गुणधर्म देखील खूप आहेत. तुळशीच्या पानांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. प्रामुख्याने व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, जस्त आणि लोह यासोबतच सायट्रिक, टार्टरिक आणि मॅलिक ऍसिड आढळते. जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. मात्र, तुळशीच्या रोपट्याची योग्य काळजी न घेतल्यास ती कोमेजून जाते. तुळस जर वारंवार कोमेजून जात असेल किंवा तिची वाढ खुंटत असेल तर? हे घ्या उपाय(How To Grow Tulsi Plant Faster - Plant Care Tips).
योग्य आकाराच्या कुंडीत रोप लावा
तुळशीच्या रोपट्यासाठी कुंडीची लांबी रुंदी पाहून खरेदी करा. सहसा तुळशीचं रोपटं खरेदी करताना बाजारात लहान कुंडी देतात. तुळशीसाठी १२ इंचाची कुंडी निवडणे उत्तम ठरेल. त्यामुळे तुळशीला वाढण्यास पुरेशी जागा मिळते.
सतत हिरडीतून रक्त येते? हा आजार की गंभीर आजाराची लक्षणे? डॉक्टर सांगतात..
योग्य मातीची निवड
जर तुळस वारंवार कोमेजून जात असेल तर माती कदाचित खराब असू शकते. कधी - कधी मातीमध्ये देखील केमिकल मिसळले जाते. ज्यामुळे तुळस कोमेजून जाते. तुळशीचं रोपटं लावण्यासाठी ड्रेन मातीची निवड करा. ज्यामध्ये 50% बागेची माती, 20% वाळू, 10% गांडूळ खत आणि 10% सेंद्रिय खत असते.
कटिंग महत्वाची
तुळशीचं रोपटं जर भरीव दिसत नसेल तर, सुकलेल्या पानांची कटिंग करत राहा. यासोबतच झाडात अनेक फांद्या दिसत असतील तर, त्याही कटिंग करून टाकावे. त्यामुळे लांबी व रुंदी दोन्हीमध्ये समान वाढ होते व झाड दाट दिसते.
पावसाळ्यात हमखास पोट बिघडतं, ४ गोष्टींची काळजी घ्या नाहीतर पावसाळ्यात तब्येत बिघडणारच!
सेंद्रिय खत वापरा
तुळशीची योग्य वाढ होण्यासाठी त्यामध्ये वेळोवेळी सेंद्रिय खतांचा वापर करणे आवश्यक आहे. पण जेव्हाही त्यात खत मिसळाल तेव्हा, त्याआधी झाडाची माती पूर्णपणे स्वच्छ करून मळून घ्या. यानंतर, पाण्यात मिसळल्यानंतर खताचा वापर करा, व कुंडी पूर्णपणे मातीने भरा. मात्र, त्यानंतर २ ते ३ दिवस त्यात पाणी घालू नका.