Join us  

कुंडीतल्या मातीचा कस वाढविणारे ३ पदार्थ, माती बदलण्याची गरज नाही- बाग नेहमीच सदाबहार राहील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2023 10:33 AM

Gardening Tips: झाडांची चांगली वाढ होत नसेल तर अनेक जण माती बदलून पाहतात (How to improve soil quality?). पण असं करण्यापेक्षा हा एक सोपा उपाय करून पाहा (Homemade solution for plant growth)...

ठळक मुद्देआपण नर्सरीतून जेव्हा रोपं घरी आणतो आणि कुंडीत लावतो तेव्हा देखील रोप लावताना मातीमध्ये हे मिश्रण टाका. यामुळे मुळांची वाढ चांगली होते आणि मुळं लवकर रुजतात

बऱ्याचदा आपण झाडांना चांगलं खत- पाणी घालतो. त्यांना व्यवस्थित ऊन मिळेल याची काळजी घेतो. पण तरीही झाडांची चांगली वाढ होत नाही. झाडं छान हिरवीगार दिसत नाहीत किंवा मग सुकल्यासारखी वाटतात. छान हिरवीगार दिसत नाहीत. असं जर वारंवार होत असेल तर मग आपण कुंडीतली माती बदलून पाहतो. पण झाडांच्या अशा काही तक्रारी जाणवत असतील तर त्यासाठी दरवेळी कुंडीतली माती बदलण्याची गरज नाही (ow to stimulate plant roots?). त्याऐवजी काही साधे सोपे घरगुती उपाय करून मातीचा कस वाढविता येताे (How to improve soil quality?). त्यासाठी नेमकं काय करायचं ते आता पाहूया..(Homemade solution for plant growth)

 

मातीचा कस कसा वाढवायचा?

हा उपाय इन्स्टाग्रामच्या gardening.999 या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

यासाठी आपल्याला १ टेबलस्पून साखर, १ टेबलस्पून बेकिंग सोडा आणि १ टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर लागणार आहे. 

ब्रिटिश पंतप्रधानांच्या पत्नी अक्षता मुर्तींनी दिवाळीत घातला होता 'गंडाबेरुंडा' नेकलेस- बघा त्या नेकलेसची एवढी चर्चा का?

सगळ्यात आधी एका काचेच्या भांड्यात १ ग्लास पाणी घ्या. त्यात साखर, बेकिंग साेडा आणि व्हिनेगर टाका.

सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. भांड्याचं तोंड प्लास्टिकची पिशवी लावून पॅक करून घ्या.

 

हे भांडं ४८ तास सुर्यप्रकाशात ठेवा. असं केल्याने भांड्यातलं मिश्रण फर्मेंट होईल. त्यानंतर हे मिश्रण थोडं थोडं करून कुंडीतल्या मातीमध्ये टाका. आठवड्यातून एकदा झाडांना असं खत दिल्याने रोपं छान बहरून जातील.

विकतचं केमिकलयुक्त गुलकंद कशाला? बघा घरच्याघरीच १०० टक्के नॅचरल गुलकंद करण्याची सोपी रेसिपी

आपण नर्सरीतून जेव्हा रोपं घरी आणतो आणि कुंडीत लावतो तेव्हा देखील रोप लावताना मातीमध्ये हे मिश्रण टाका. यामुळे मुळांची वाढ चांगली होते आणि मुळं लवकर रुजतात (Homemade rooting agent for plants).

 

 

 

टॅग्स :बागकाम टिप्सगच्चीतली बागइनडोअर प्लाण्ट्सपाणी